डोंबिवली – डोंबिवलीत दिवसाढवळ्या भुरट्या चोऱ्या, लुटमार, घरफोडीचे प्रकार सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बुधवारी दुपारी वर्दळीच्या रस्त्यावर डोंबिवली पूर्व भागात दोन भामट्यांनी एका ७२ वर्षांच्या सेवानिवृत्त नागरिकाला लुटले. या नागरिकाजवळील सोन्याचा ऐवज, रोख रक्कम असा ३९ हजारांचा ऐवज लुटून भामटे पसार झाले.

अनिल डेविड तांबे (७२, रा. सिध्दार्थ रेसिडेन्सी, दिवा पूर्व) हे डोंबिवलीत आपली निवृत्तीची रक्कम स्टेट बँकेच्या टिळकनगर शाखेत काढण्यासाठी आले होते. काम झाल्यानंतर ते बँकेकडून डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या दिशेने बुधवारी दुपारी साडेबारा वाजता चालले होते. शहीद भगतसिंग रस्ता येथील ठाणे भारत सहकारी बँक समोर आल्यानंतर त्यांना दोन अनोळखी व्यक्ती आडवे आले. त्यांनी अनिल यांच्याशी इंग्रजीतून संभाषण सुरू केले. त्यांना बोलण्यात गुंतवून वेलची खाण्यास दिली. दुपारची वेळ आहे. तुम्हाला कोणी लुटेल. तुमच्या जवळील रोख, सोन्याचा ऐवज आमच्या जवळ द्या, असे बोलून त्यांनी तोंडातील वेलचीचा चोथा जवळच्या झाडाच्या बुडाशी टाकण्यास सांगितला. अनिल झाडाजवळ जाताच त्यांच्यापासून काही अंतरावर असलेले दोन्ही भुरटे चोर अनिल तांबे यांनी त्यांच्या हातात स्वाधीन केलेली पिशवी घेऊन पळून गेले.

हेही वाचा – “नशिबाने तुम्हाला हत्ती दिले, तुम्ही चप्पल चोरायच्या गोष्टी करू नका” आमदार प्रमोद पाटील यांचा खासदार श्रीकांत शिंदेंवर प्रहार

हेही वाचा – येऊरसह घोडबंदरच्या आदिवासीपाड्यांवरही पाणी टंचाई; टंचाईची समस्या सोडविण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजनांचा आराखडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिशवीत रोख रक्कम, सोन्याचा ऐवज असा एकूण ३९ हजारांचा ऐवज होता. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अनिल यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीस उपनिरीक्षक के. पी. वाडकर तपास करत आहेत.