कल्याण: कल्याण पूर्वेतील चिकणी पाडा येथील श्री सप्तश्रृंगी इमारतीमध्ये घरामधील दुरुस्ती करताना कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाची किंवा सोसायटीची परवानी घेतली नाही. अशाप्रकारे विनापरवानगी घरात तोडफोड करून घर सौंदर्यीकरणाचे काम करताना स्लॅब कोसळून सोसायटीतील सहा जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल श्री सप्तश्रृंगी इमारतीमधील रहिवासी कृष्णा लालचंद चौरासिया यांच्या विरुध्द पालिकेने मंगळवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

महाराष्ट्र प्रांतिक व नगररचना प्रादेशिक अधिनियम कलम ४४ सह एकत्रित विकास नियंत्रण नियमावलीच्या नियम २(२) प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली पालिका वरिष्ठांच्या सूचनेवरून जे प्रभागाचे साहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री तक्रार केली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून श्री सप्तश्रृंगी सोसायटीमधील रहिवासी कृष्णा चौरासिया यांना ताब्यात घेऊन त्यांना रात्रीच अटक केली.

श्री सप्तश्रृंगी इमारत ही सुमारे वीस वर्षापूर्वी बांधण्यात आली आहे. गेल्या वर्षी ही इमारत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली आहे. दोन दिवसापूर्वीच या इमारतीच्या मालकाला इमारत धोकादायक झाल्याने रिकामी करण्याची नोटीस बजावली होती. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरला पालिकेकडून पालिका हद्दीतील धोकादायक इमारतीच्या मालकांना इमारत रिकाम्या करण्याच्या नोटिसा पाठविल्या जातात.

पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती, अशी की चिकणी पाडा येथील श्री सप्तश्रृंगी इमारतीच्या चौथ्या माळ्यावर कृष्णा चौरासिया कुटुंबीयांसह राहतात. कृष्णा यांनी घर सौंदर्यीकरणासाठी घरात टाईल्स बसविण्याचे काम कामगारांच्या माध्यमातून मंगळवारी हाती घेतले होते. घरात तोडफोड सुरू होती. ही तोडफोड सुरू असताना अचानक बसणाऱ्या दणक्यांनी कृष्णा यांच्या घरातील पृष्ठाचा भाग कोसळला. हा भाग तिसरा, दुसरा आणि पहिल्या माळ्यावर आपटत जाऊन थेट तळमजल्याला पडला. स्लॅब कोसळत असताना तिसऱ्या, दुसऱ्या आणि पहिल्या माळ्यावरील जे सदस्य स्लॅबच्या टप्प्यात आले. ते जखमी झाले. काही जण स्लॅबखाली अडकून पडले. या दुर्घटनेत सहा जणांचा मृ्त्यू झाला. सहा जण जखमी झाले.या दुर्घटनेला कृष्णा चौरासिया हे जबाबदार असल्याचा ठपका पालिकेने ठेवला आहे. कृष्णा यांच्या विरुध्द कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री तक्रार केली. पोलिसांनी त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.मुख्यमंत्री साहाय्यता निधीश्री सप्तश्रृंगी इमारतीमधील सुमारे ५२ रहिवाशांची कल्याण पूर्वेतील नूतन विद्यामंदिरातील शाळेत पालिकेने तात्पुरत्या निवाऱ्यासाठी सोय केली आहे. या दुर्घटनाग्रस्त इमारतीची मंगळवारी रात्री भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पाहणी केली. मृत कुटुंबीयांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदत केली जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले. इमारतीमधील रहिवाशांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी पालिका प्रशासनाने योग्य ती सुविधा करावी, अशी सूचना चव्हाण यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत कुटुबीयांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत जाहीर केली आहे.