scorecardresearch

Premium

कल्याण जनता सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अनंत कुलकर्णी

गेली ४१ वर्ष ते बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. कुलकर्णी यांनी यापूर्वी राजगुरूनगर सहकारी बँक, पुणे येथील जनसेवा सहकारी बँक, श्री शारदा सहकारी बँकेत वरिष्ठ पदावर काम केले आहे.

anant kulkarni appointed as ceo of kalyan janta sahkari bank
कल्याण जनता सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अनंत कुलकर्णी (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

कल्याण : येथील कल्याण जनता सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी पदी अनंत कुलकर्णी यांची नुकतीच निवड करण्यात आली. बँकेच्या अलीकडेच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष, सनदी लेखापाल सचिन आंबेकर यांनी कुलकर्णी यांच्या निवडीची घोषणा केली.

मागील १२ वर्षापासून अनंत कुलकर्णी कल्याण जनता सहकारी बँकेत कार्यरत आहेत. मागील एक वर्षापासून ते सरव्यवस्थापक पदावर कार्यरत होते. गेली ४१ वर्ष ते बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. कुलकर्णी यांनी यापूर्वी राजगुरूनगर सहकारी बँक, पुणे येथील जनसेवा सहकारी बँक, श्री शारदा सहकारी बँकेत वरिष्ठ पदावर काम केले आहे.

rpi athwale group workers dressed in school uniform for protest
सातारा:शालेय गणवेशात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात शाळा; सांग सांग एकनाथ शाळा टिकेल काय म्हंटली कविता
onine, nashik onion strick
नाशिक: कांदा कोंडी फुटली; व्यापाऱ्यांचा संप मागे
Swarda Bapat in the Executive Committee
पुणे शहर भाजपची कार्यकारिणी जाहीर; गिरीश बापट यांची स्नुषा स्वरदा बापट यांना कार्यकारिणीत स्थान
industry meet in nagpur, inauguration of industry meet in nagpur, today industry meet in nagpur
नागपूर : बेरोजगार तरुणांना रोजगार.. ‘इंडस्ट्री मिट’ आज..

हेही वाचा : दिवा रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी

ज्येष्ठ व्याख्याते आणि प्रशिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. कल्याण जनता बँक बहुराज्यीय शेड्युल्ड बँक आहे. बँकेचा एकूण व्यवसाय पाच हजार ४०० कोटीचा आहे. ६० हजाराहून अधिक सदस्य बँकेत आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये बँकेच्या एकूण ४३ शाखा आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In kalyan anant kulkarni appointed as ceo of kalyan janta sahkari bank css

First published on: 17-09-2023 at 14:58 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×