कल्याण – नियमित काम करूनही वखार मालकाने १६ महिन्यांचा पगार न दिल्याने चिंताग्रस्त कामगाराने वखारीतील एका कोपऱ्यात शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. या कामगाराच्या डोक्यावर कर्ज होते. ते फेडण्यास पैसे नसल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला.

कैलास अहिरे असे कामगाराचे नाव आहे. ते डोंबिवलीत आयरे गाव परिसरात राहत होते. कैलास कल्याणजवळील शहाड येथील बंदरपाडा भागातील एका लाकडाच्या वखारीत काम करत होते. नियमित काम करूनही वखार मालक वेतन देत नसल्याने घरगाडा कसा चालवायचा असा प्रश्न कैलास समोर होता. याशिवाय त्यांनी कर्ज घेतले होते. त्या कर्जाचे हप्ते थकत होते. मित्र परिवाराकडून उसनवारीने पैसे घेऊन कैलास घरगाडा चालवित होते.

हेही वाचा – डोंबिवलीतील फडके रस्त्यावरील बुक स्ट्रीटला वाचकप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद, पाच तासांत सहा हजार नागरिकांचा सहभाग

मालकाकडे वेतन मागितले की तो फक्त आश्वासन देत होता. वेतन मिळत नाही हे घरी कसे सांगायचे असा प्रश्न कैलास यांच्यासमोर होता.
मालकाकडे सतत तगादा लावूनही वेतन मिळत नाही. कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, उसनवारीचे पैसे परत कसे करायचे असे प्रश्न कैलास यांच्यासमोर उभे राहिल्याने त्यांनी वखारीच्या एका कोपऱ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा – ठाणे: मोठमोठय़ा इमारती उभारणे म्हणजे विकास नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांची स्पष्टोक्ती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत वखारीतील घटनाक्रम लिहिला आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी कैलास यांचा मुलगा यशवंत याने तक्रार केली आहे. पोलीस चौकशी करत आहेत.