कल्याण : कल्याणमध्ये रामबाग भागात एका ओळखीच्या इसमाने एका व्यावसायिकाचा मोबाईल काही कामानिमित्त घेतला. तो मोबाईल परत न देता मोबाईलमधील गुगल पेच्या माध्यमातून व्यावसायिकाच्या बँक खात्यातून दोन लाख ७१ हजार रुपये काढून घेतले. व्यावसायिकाचा मोबाईल परत न देता तो हडप केला. कल्याण पश्चिमेतील रामबाग भागात राहत असलेले मैदुल इस्लाम यांच्या तक्रारीवरुन महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मैदुल यांच्या ओळखीचा इसम कुणाल टाक याच्याविरुध्द तक्रार नोंद केली आहे.

कुणाल हा कल्याणमध्ये हिंदू हायस्कूल भागात राहतो. सोमवार ते मंगळवार या दरम्यानच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार झाला. पोलिसांनी सांगितले, मैदुल यांचे रामबाग भागात चष्माचे दुकान आहे. या दुकानात सोमवारी ते ग्राहक सेवेसाठी बसले होते. त्यावेळी तेथे आरोपी कुणाल टाक आला. त्याने व्यावसायिक मैदुल यांना मला एकाला फरसाणच्या पाकिटाची छायाचित्रे पाठवायची आहेत. तुम्ही मला तुमचा मोबाईल काही वेळेसाठी द्या, असे सांगितले. मैदुल यांनी तात्काळ कुणाल याला मोबाईल दिला. कुणाल याने मोबाईल नेल्यानंतर तो परत आणून दिला नाही. मैदुल यांनी सतत मागणी करुनही कुणाल मोबाईल परत देत नव्हता.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा : पावसाच्या धारात घामाच्याही धारा! ऊन पावसाचा लपंडाव, गणेशभक्तांची तारांबळ

मंगळवारी आरोपी कुणालने मैदुल यांच्या गुगल पेचा वापर केला. या माध्यमातून मैदुल यांच्या डोंबिवलीतील बंधन बँकेच्या खात्यामधून ऑनलाईन माध्यमातून दोन लाख ७१ हजार ४१० रुपये परस्पर काढून घेतले. तक्रारदार मैदुल यांना मोबाईलवर रक्कम काढल्याचे लघुसंदेश आले. त्यावेळी त्यांना आपल्या बँक खात्यामधून रक्कम काढल्याचे कळले. कुणाल याने मोबाईल परत न करता मैदुल यांच्या बँक खात्यामधून रक्कम काढून त्यांची दोन लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक वंजारे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Story img Loader