ठाणे : अजितदादावर टीका करताना जितेंद्र आव्हाड यांनी हे लक्षात ठेवावे की बात निकली है, तो दूर तक जाएगी, चिंगारी भडकी है तो आग भी लग जायेगी, ये आग कळवा-मुंब्रा तक भी जाएगी, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिला आहे. बेताल वक्तव्य करणे ही जितेंद्र आव्हाड यांची सवय झाली असून महाराष्ट्राच्या राजकारणातील ध चा मा करणारे ते आनंदीबाई आहेत, असा टिकाही त्यांनी केली आहे.

जितेंद्र आव्हाड हे २००९ ला पहिल्यांदा कळवा-मुंब्र्यातुन निवडून आले. त्यावेळी ठाण्यातील कार्यकर्त्यांनी जी त्यांच्यासाठी मेहनत घेतली. त्यांना खांद्यावर उचलून घेतले आणि विजयी केले. त्यातले पाच टक्के कार्यकर्ते देखील आज त्यांच्याबरोबर नाहीतस हे आत्मचिंतन पहिले त्यांनी करावे. जेव्हा पहिल्यांदा अजित पवार लोकसभेत निवडून आले, त्यावेळेला शरद पवार यांच्या आशीर्वादने निवडून आले. पण त्यानंतर सातत्याने कामाचा ठसा अजित पवार यांनी उमटविला आहे आणि त्याचबरोबर कायम वाईटपणा घेण्याचे काम त्यांनी केले. निर्णय शरद पवार यांचे असायचे पण त्याचा होणारा नकारात्मक परिणामामुळे कायम अजित पवार बदनाम झाले, ही वस्तुस्थिती आहे, असा दावाही परांजपे यांनी केला.

हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीत नागरिक करणार स्वतःच्या घराची कर आकारणी, कर लावतानाचे गैरप्रकार रोखण्याचा प्रयत्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोना काळात राज्याची आर्थिक घडी बिघडू नये आणि राज्याचे उत्पन्नाचे स्त्रोत कमी झालेले होते. याकाळात शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार व मुलभुत सुविधांना पैसा कमी पडू नये म्हणून अर्थ मंत्री असताना अजित पवार यांनी जे उत्कृष्ट आर्थिक नियोजन केले, त्याची प्रशंसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. अजित पवार यांच्या अनेक क्रांतिकारक निर्णयामुळे महाराष्ट्र पुढे गेलेला आहे. विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी कायम सत्ताधाऱ्यांवर हल्ला करण्याचे काम केले आहे. परमार केसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे स्वतःला वाचविण्यासाठी कितीवेळा तुम्ही नाक घासायला गेला होतात. हिंदूत्ववादी संघटनांनी जितेंद्र आव्हाड यांचे पुतळे जाळले, चपलांचा हार घातला हे ते विसरलेले दिसतात. बात निकली है तो दूर तक जाएगी, चिंगारी भडकी है तो आग भी लग जायेगी, ये आग कळवा-मुंब्रा तकभी जाएगी, असा इशारा परांजपे यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना न मिळता शरद पवार यांना मिळाले पाहिजे, अशी बाजु शरद पवार गटाने मांडली होती. आताही निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्या संदर्भात आम्ही सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. ही न्यायालयातील लढाई आहे, ही राजकीय लढाई आहे. याच्यामध्ये रडण्याचे काही कारणच नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.