ठाणे : लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ठाणे वाहतूक पोलिसांनी ठाणे येथील कोर्टनाका आणि भिवंडी येथील प्रांत अधिकारी कार्यालय परिसरात वाहतूक बदल लागू केले आहेत. ज्या दिवशी उमेदवार अर्ज दाखल करणार असतील. त्यादिवशी हे बदल लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे ठाणेकरांना कोंडीचा सामना करावा लागत आहे.

ठाणे जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे २६ एप्रिलपासून उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज दाखल करताना उमेदवारांकडून रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले जाते. या रॅलीमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले आहेत. जीपीओ येथून कोर्टनाका, ठाणे स्थानकाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवरील सर्व वाहनांना जीपीओ येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने मध्यवर्ती कारागृह मार्ग, दादोजी कोंडदेव स्टेडिअम येथून वाहतूक करतील. ठाणे रेल्वे स्थानक, चरई येथून टेंभीनाका मार्गे कोर्टनाका येथे वाहतूक करणाऱ्या वाहनांना टेंभीनाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने टेंभीनाका येथून पुढे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जुन्या इमारतीजवळून वाहतूक करतील. कळवा येथून कोर्टनाक्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना उर्जिता उपाहारगृहाजवळ प्रवेशबंदी असेल. येतील वाहने मध्यवर्ती कारागृह मार्गे वाहतूक करतील. महागिरी आणि खारकर आळी परिसरातून कोर्टनाक्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या ठाणे पोलीस शाळेजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने पारेख ट्रान्सपोर्ट मार्गे वाहतूक करतील.

हेही वाचा : आरसीबी आणि सनरायझर्स हैदरबाद आयपीएल सामन्यात सट्टेबाजी, तीन बुकींना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच भिवंडी शहरात वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना वंजारपट्टी नाका येथे तर हलक्या वाहनांना भिवंडी एसटी थांब्याजवळ प्रवेशबंदी असेल. येथील अवजड वाहने चांविद्रा, नाशिक मार्गे वाहतूक करतील. तर हलकी वाहने जूना निजामपूरा नाका, चाँदतारा मशीद, दिवंगत आनंद दिघे चौकातून वाहतूक करतील. रांजनोली, अंजूरफाटा मार्गे गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना रांजनोली आणि अंजूरफाटा येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने नाशिक मार्गे वाहतूक करतील. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसांत आणि अर्ज मागे घेण्याच्या कालावधीमध्ये ६ मे पर्यंत हे वाहतूक बदल लागू असतील.