कल्याण : राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांची नोंदणी करण्यासाठी शासनाने महास्वयंम पोर्टल सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांपासून या पोर्टलचा सर्व्हर संथगती असल्याने ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून या पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांना अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे. याविषयीच्या अनेक तक्रारी ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड, शहापूर, भिवंडी परिसरातील तरूणांकडून करण्यात येत आहेत. महास्वयंम पोर्टल संथगतीने चालत आहे. या पोर्टलवर तात्काळ सुशिक्षित बेरोजगारांना नोंदणी करणे शक्य होत नाही, अशा अनेक तक्रारी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार, विद्यार्थी, उद्योजक, नियोक्ते, प्रशिक्षक या गटांनी शासनाच्या कौशल्य विकास विभागाकडे केल्या आहेत. उपलब्ध नोकऱ्या, उद्योजकतेमधील संधी यांचे सम आकलन करून त्याप्रमाणे लाभार्थींना माहिती देण्याचे काम, रोजगार संधी, तरूणांमधील कौशल्ये विकसित करून त्यांना नोकरीच्या उपलब्ध करून देणे, हे काम या पोर्टलच्या माध्यमातून केले जाते. केंद्र, राज्य शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रम, प्रशिक्षण, परिपूर्णते नंतर कर्ज, उद्योजकतेच्या संधी यांची माहिती या पोर्टलवर आहे.

हेही वाचा : ठाण्यात भाडेतत्वावरील सदनिकांमध्ये घुसखोरी सुरुच, ५१ घुसखोरांना बाहेर काढून सदनिकांना महापालिकेचे टाळे

cm eknath shinde held meeting of party leaders in thane
ठाण्यासाठी मुख्यमंत्र्यांची अडीच तास बैठक
cm eknath shinde slams opposition while speaking to media in thane
घटना बदलाची चर्चा दिशाभूल करणारी – मुख्यमंत्री शिंदे
sharad pawar group leader in ambernath wish former corporator who joined shiv sena best for his future political journey
काँग्रेसच्या फुटीर नगरसेवकांना शरद पवार गटाच्या शुभेच्छा; अंबरनाथमध्ये फलकबाजीमुळे शरद पवार गटातही गळतीची चर्चा
many of the aspiring candidates of bjp file nomination application for thane lok sabha constituency
ठाण्याच्या जागेसाठी भाजपने घेतला उमेदवारी अर्ज

हे पोर्टल कधी बंद तर कधी संथगती असल्याच्या तक्रारी लाभार्थींनी कौशल्य विभागाकडे केल्या आहेत. या विभागाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे तरूणांनी सांगितले. केंद्र शासनाच्या कौशल्य विकास मोहिमे मध्ये सहभागी असलेल्या राज्य शासनाच्या विविध प्रशासकीय यंत्रणांना एकत्रित आणून कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवउद्यमशीलता विभागाकडून महास्वयंम पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुक्यातील गावांमधील अनेक पदवीधर, बेरोजगार तरूण या पोर्टलवर नोंदणीसाठी दररोज तालुक्याच्या ठिकाणी येतात. महास्वयंम पोर्टल बंद असल्याने तासन तास सायबर कॅफेत थांबून तरूण निघून जात आहेत. दररोजचा प्रवास खर्च, त्यात नोंदणीचे काम होत नसल्याने अनेक तरूणांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक वेळा ग्रामीण भागात वीज पुरवठा बंद असतो. महास्वयंम पोर्टल बंद, त्यात वीज पुरवठा नाही त्यामुळे तरूणांची दुहेरी कोंडी होत आहे.

हेही वाचा : ठाणे जिल्ह्यात झिकाचा एकही रुग्ण नाही पण, काळजी घ्या; जिल्हा आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन

महास्वयंमस पोर्टलवर नोंदणी करताना आधार कार्ड संलग्न मोबाईलवर एक ओटीपी येतो. तो ओटीपी ऑनलाईन नोंदणी रकान्यात भरला की पोर्टलवर नोंदणीची प्रक्रिया गतिमान होते. पोर्टलचा सर्व्हर कधी बंद तर कधी संथगती असल्याने ग्रामीण भागातील तरुणांनी नाराजी व्यक्त केली आहे. अधिक माहितीसाठी कौशल्य विकास विभागाकडे संपर्क साधल्यावर सर्व्हर पूर्ण क्षमतेने चालू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. लवकरच तरूणांना या पोर्टलवर नोंदणी करता येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

“महास्वयंम पो्टलवर नोंदणी करण्यासाठी मी आठवड्यातून दोन ते तीन वेळा शहापूर येथे जातो. पण तेथे पोर्टल बंद असल्याचे कारण सांगितले जाते. त्यामुळे नोंदणी होत नाही. आणि प्रवास खर्चाचा बोजा पडतो. शासनाने ही समस्या लवकर सोडवावी.” – यशवंत बेलसरे, सुशिक्षित बेरोजगार, शहापूर.