ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या संकल्पनेतून ठाणे शहराचा विकास सुरू असल्याचा दावा केला जात असताना दुसरी शहरातील घोडबंदर, वागळे इस्टेट, दिवा भागात मुख्य पदपथांवरील गटारांच्या प्रवेशद्वाराची (मॅनहोल) झाकणे गायब तसेच अर्धवट तुटलेल्या अवस्थेत असल्याचे आढळून आले आहेत. या प्रकारामुळे नागरिकांना पदपथावरून चालणे कठीण होत असून गटारामध्ये पडून नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गटाराच्या उघड्या प्रवेशद्वारासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाकडून वारंवार सरकारची कान उघाडणी झाली होती. असे असतानाही या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मुंबईतील प्रभादेवी भागात २०१७ मध्ये बाँबे रुग्णालयाचे डाॅ. दीपक अमरापूरकर यांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका तसेच राज्य सरकारला गटारांच्या प्रवेशद्वारावरून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महापालिकांनी शहरातील गटारांच्या प्रवेशद्वारावर झाकणे बसविण्यास सुरूवात केली होती. आता या प्रवेशद्वारांवर अनेक ठिकाणी झाकणे गायब झाल्याचे चित्र आहे. तर काही झाकणे अर्धवट तुटलेल्या अवस्थेत आहे.

हेही वाचा : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथचे पिंपळोलीवाडी होणार मधाचे गाव, खादी ग्रामोद्योग महामंडळाकडून प्रक्रिया सुरू

घोडबंदर येथील मानपाडा, पातलीपाडा, ब्रम्हांड, वाघबीळ, कासारवडवली येथील पदपथावरील अनेक ठिकाणी प्रवेशद्वाराची झाकणे गायब झाले आहे. येथील पदपथही चालण्यासाठी सुस्थितीत नाही. घोडबंदर मार्गावरून वाहनांची मोठ्याप्रमाणात वाहतुक होते. रस्त्याकडेला पायी चालताना वाहनांचा धोका, त्यात पदपथावरही गटाराच्या प्रवेशद्वाराची झाकणे उघडी असल्याने पदपथावरून चालणे धोक्याचे झाले असे नागरिक म्हणत आहेत. दिवा येथील विकास म्हात्रे गेट परिसरात काही ठिकाणी झाकणे तुटलेली आहे. तर, वागळे इस्टेट येथील रोड क्रमांक २२, रोड क्रमांक १६ येथेही काही ठिकाणी झाकणे गायब आहेत. तसेच काही झाकणे अर्धवट तुटलेल्या अवस्थेत आहेत. या भागातील पदपथांवरून नागरिक ये-जा करत असतात.

हेही वाचा : डोंबिवली जीमखाना येथील राम मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी भाविकांची झुंबड, मोबाईलमधून प्रतिमा काढण्यासाठी चढाओढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“गेल्या आठ महिन्यांपासून दिवा येथील विकास म्हात्रे गेट भागातील झाकणे तुटले आहेत. याबाबत नागरिकांनी येथील माजी स्थानिक प्रतिनिधींकडे केले होती. परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर आम्ही महापालिकेकडे तक्रार केली. तेव्हा काही गटारांच्या प्रवेशद्वारावर झाकणे बसविली. परंतु अद्यापही काही गटारे उघडीच आहेत. येथे लहान मुले खेळत असतात. त्यामुळे ही मुलांना दुखापत होण्याची शक्यता आहे.” – नागेश पवार, रहिवासी, दिवा.