ठाणे : उल्हासनगरमधील हिललाईन पोलिस ठाण्यामध्ये शुक्रवारी रात्री भाजपचे कल्याण पुर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेवर खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कोण काय म्हणतो यापेक्षा सीसीटिव्ही फुटेजमधून सत्य लोकांसमोर आले असून याप्रकरणास जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई व्हावी, ही पोलिसांकडून अपेक्षा आहे, असे खासदार शिंदे यांनी म्हटले आहे.

हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनामध्ये शुक्रवारी रात्री आमदार गणपत गायकवाड आणि शहरप्रमुख महेश गायकवाड हे दोघे बसले होते. त्यावेळी आमदार गायकवाड आणि शहरप्रमुख महेश यांच्यात बोलाचाली झाली. यावरून संतप्त झालेल्या आमदार गायकवाड यांनी महेश यांच्यावर गोळीबार केला. यात महेश आणि त्यांचा सहकाही राहुल पाटील हे दोघे जखमी झाले. या दोघांना ठाण्याच्या ज्युपीटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ज्युपिटर रुग्णालय प्रशासनाने मेडिकल बुलेटिन काढून दोघांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट दिली असून त्यात महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक तर, राहुल पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे.

kalyan lok sabha seat, dr Shrikant Shinde, criticise uddhav thackeray, criticise vaishali darekar, lok sabha 2024, mimicry artist, uddhav thackeray mimicry artist, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, kalyan dombivali news, election 2024,
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Ganesh Naik-Subhash Bhoirs meeting is the beginning of new political equation
गणेश नाईक-सुभाष भोईर यांच्या भेटीच्या चर्चेने नव्या राजकीय समीकरणाची नांदी?
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र

हेही वाचा : “घटना दुर्दैवी…महेश गायकवाडांनी लवकर बरे व्हावे”, मुख्यमंत्र्यांची गोळीबार प्रकरणानंतर पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन महेश यांच्या प्रकृतीची विचारपुस केली. त्यावेळी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे हे सुद्धा उपस्थित होते. यानंतर खासदार शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेबाबत माहिती दिली. महेश गायकवाड यांच्यावर सहा तास शस्त्रक्रीया सुरु होती. त्यांच्यावर झाडण्यात आलेल्या गोळ्यांची संख्या सहा असून या सर्व गोळ्या डाॅक्टरांनी बाहेर काढल्या आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून डाॅक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. राहुल पाटील यांना दोन गोळ्या लागल्या असून त्यांच्यावरही शस्त्रक्रीया झाली आहे. त्यांना लागलेल्या गोळ्या बाहेर काढण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : गोळीबारात जखमी झालेले महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक, रुग्णालय प्रशासनाने दिली माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांच्या प्रकृतीची विचारपुस केली असून त्याचबरोबर डाॅक्टरांशी चर्चा करून ते कसे बरे होतील, त्यासाठी काय करता येईल, याबाबत चर्चा केली, असे खासदार शिंदे यांनी म्हटले आहे. पोलिस याप्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. कोण काय म्हणत आहे, त्यापेक्षा सीसीटीव्ही फुटेजमधून सत्य लोकांच्या समोर आहे. याप्रकरणाची पोलिसांकडून अजून चौकशी सुरु आहे. यात याप्रकरणात जे जबाबदार आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, ही पोलिसांकडून अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे.