ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने यंदाही संगीतभूषण पं. राम मराठे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या या महोत्सवात पं. सुरेश तळवलकर यांना राज्यस्तरीय तसेच निषाद बाक्रे यांना युवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच पंडित राम मराठे यांचे यंदा जन्म शताब्दी वर्ष असल्याने त्यांच्यासोबत काम केलेल्या सात ज्येष्ठ कलाकारांचा यावेळी कृतज्ञता सन्मान करण्यात येणार आहे. या महोत्सवात नामवंत, ज्येष्ठ कलाकार तसेच नवोदित कलाकार यांचा सुरेल संगम रसिकांना अनुभवता येणार आहे.

ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन या महोत्सवाची माहिती दिली. यंदा या महोत्सवाचे २८ वे वर्ष आहे. ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह येथे १ ते ३ डिसेंबर या कालावधीत हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात पं. सुरेश तळवलकर यांना राज्यस्तरीय तसेच निषाद बाक्रे यांना युवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पंडित राम मराठे यांचे यंदा जन्म शताब्दी वर्ष असल्याने त्यांच्यासोबत काम केलेल्या सात ज्येष्ठ कलाकारांचा यावेळी कृतज्ञता सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली.

cannes film festival, FTII, short film,
प्रतिष्ठित कान चित्रपट महोत्सवात पुण्याच्या एफटीआयआयचा लघुपट
Rashmi Thackeray in Thane for Chaitra Navratri festival
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन
ram navami, shobha yatra, akola, vishwa hindu parishad, ram navami in akola, ram navami shobha yatra, ram navami vishwa hindu parishad, marathi news, ram navami news, akola news,
अकोला : रामनवमीनिमित्त राजराजेश्वरनगरी भगवामय; शोभायात्रेची ३८ वर्षांची परंपरा
sangeet natak akademi kolhapur marathi news
संगीत नाटक अकादमीच्या वतीने अंबाबाई मंदिरात बुधवार, गुरुवारी ‘शक्ती महोत्सवा’चे आयोजन

हेही वाचा : ठाण्यात आरोग्य व्यवस्थेचा विस्तार, शहरातील छोट्या रुग्णालयांमधील खाटांची संख्या वाढणार

या महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात पं. राम मराठे यांचे नातू युवा गायक भाग्येश मराठे यांच्या गायनाने होणार आहे. तर, ज्येष्ठ सरोद वादक सुजात खान यांच्या सरोद वादनाने पहिल्या दिवसाची सांगता होईल. या दोन्ही कार्यक्रमांच्या मध्यांतात पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. महोत्सवाचा दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ वादक भीमण्णा जाधव यांच्या सुंदरी वादनाने सुरु होणार आहे. या कार्यक्रमानंतर नृत्यांगना शर्वरी जमेनिस या नृत्य अविष्कार सादर करणार आहेत. त्यांना पं. मुकुंदराज देव तबल्याची साथ देणार आहेत. कार्यक्रमाची सांगता ज्येष्ठ गायिका शुभा मुदगल यांच्या गायनाने होईल. त्यांना अनिश प्रधान आणि सुधीर नायक हे साथसंगत करणार आहेत तिसऱ्या दिवशी युवा कलाकार शाश्वती चव्हाण यांचे गायन आणि मंजिरी वाठारे यांचे नृत्य सादरीकरण होणार आहे. यानंतर, पं. राम मराठे यांचे पुत्र मुकुंद मराठे यांनी दिग्दर्शित केलेल्या संगीत मंदारमाला या नाटकाचा प्रयोग होणार आहे. या महोत्सवाची सांगता ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे देशपांडे आणि ज्येष्ठ गायक पं. संजीव अभ्यंकर यांच्या ‘जसरंगी’ या अनोख्या कार्यक्रमाने होणार आहे, असे माळवी यांनी सांगितले. या महोत्सवात विनामूल्य प्रवेश असून जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन संदीप माळवी यांनी केले आहे.

हेही वाचा : पुनर्विलोकन यादीत निवृत्त, मयत कर्मचाऱ्यांचा समावेश, कल्याण डोंबिवली पालिकेतील प्रकार

पं. राम मराठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने, आयोजित महोत्सवासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये पं. राम मराठे यांचे चिरंजीव संजय मराठे, मुकुंद मराठे, ज्येष्ठ कलाकार मारुती पाटील, पं. मुकुंदराज देव, पं. विवेक सोनार, हेमा उपासनी, अपूर्वा गोखले, कार्यक्रम आयोजक रवी नवले, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांचा समावेश आहे.

हेही वाचा : रस्ते प्रकल्पातील वर्ग-२ जमीनचे अडथळे दूर, जमीन मालकांना मोबदलाही मिळणार

राम मराठे महोत्सवाची गेले काही वर्ष पुरेशाप्रमाणात जनजागृती होत नसल्यामुळे या महोत्सवात रसिक वर्ग कमी संख्येने उपस्थित राहत असल्याची बाब समोर आली होती. परंतू, यंदा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी ठाणे महापालिकेमार्फत या महोत्सवाच्या जनजागृतीसाठी नियोजन आखले आहे. वृत्तपत्रांच्या प्रसिद्धीसह, महापालिकेने शहरातील मुख्य चौकाचौकात या महोत्सवाचे फलक लावण्याचे ठरविले आहे. महोत्सवात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमंत्रित कलाकार आणि गायक यांच्यामार्फत केले जाणार असून त्यासाठी त्यांची चित्रफीत तयार करण्यात येणार आहे.