ठाणे : ठाकरे गटाने रविवारी सायंकाळी श्रीराम रथ मिरवणूक आणि दिंडीचे आयोजन केले होते. या मिरवणूकीत राम भक्त मोठ्याप्रमाणात सहभागी झाले होते. अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यानिमत्ताने ठाकरे गटाने रविवारी सायंकाळी श्रीरामरथ मिरवणूक, पालखी आणि दिंडीचे आयोजन केले केले होते.

हेही वाचा : ५० लाख रुपये देत नाही म्हणून महिलेने दिली डाॅक्टरच्या हत्येची सुपारी, पोलिसांनी बनावट मारेकरी पाठवून महिलेला केले जेरबंद

दिंडीची सुरूवात राम मारूती रोड येथील श्री गजानन महाराज मंदिरातून सुरूवात झाली. मिरवणूकीत राम मंदिराची प्रतिकृती देखील ठेवण्यात आली होती. शहराती घंटाळी मंदिर, श्री कौपिनेश्वर मंदिर, श्री सिद्धिविनायक मंदिर, जांभळीनाका येथे मिरवणूकीचा समारोप झाला. सोमवारी सकाळी नऊ वाजल्यापासून वारकरी भवन येथे राम उत्सव, अभिषेक, भजन, कीर्तन आयोजित करण्यात आल्याचे ठाकरे गटाकडून स्पष्ट करण्यात आले.