ठाणे – स्थावर संपदा क्षेत्रातील ‘एजंट’ हा घर खरेदीदार आणि विकासक यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा असतो. बहुतांशवेळा ग्राहक पहिल्यांदा एजंटच्याच संपर्कात येतात. ग्राहकांना प्रकल्पाच्या अनुषंगाने प्राथमिक माहिती त्यांच्याकडूनच मिळते. मात्र अनेकदा खोट्या माहितीमुळे आणि महारेराकडे नोंदणी नसलेल्या एजंट्स कडूनच ग्राहकांची फसवणूक झाल्याचे अनेकदा समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर महाऱेराच्या निकषात बसत नसलेल्या ठाणे जिल्ह्यातील तब्बल ४ हजार ३०३ एजंट्स ची नोंदणी महाऱेराकडून रद्द करण्यात आली आहे. तर सद्यस्थितीत ६ हजार ७६० नोंदणीकृत एजंट्स जिल्ह्यात कार्यरत असल्याची माहिती महारेराकडून देण्यात आली.
महारेराकडे नोंदवल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांनी नुकताच ५० हजारांचा टप्पा ओलांडल्यानंतर स्थावर संपदा क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एजंटसच्या संख्येनेही महाराष्ट्रात ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. याबाबत महाऱेराकडून क्षेत्रनिहाय एजंट्सची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिक घर घेताना विविध पद्धतीने चौकशी करून घर घेण्याची प्रक्रिया राबवतो. यामध्ये घराची नोंदणी तसेच संबंधित विकासकाची महारेरामध्ये नोंदणी याबाबत तपासणी करण्यासाठी यामध्ये सर्वात मोठी मदत ग्राहकाला ही संबंधीत एजंट्स कडून केली जाते. यामुळे ‘एजंट’ हा ग्राहकाचा विकासक, महारेरा यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा असतो. मात्र अनेकदा खोट्या माहितीमुळे आणि महारेराकडे नोंदणी नसलेल्या एजंट्स कडूनच ग्राहकांची फसवणूक झाल्याचे अनेकदा समोर आले आहे. यामुळे ग्राहकाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. याच पार्श्वभूमीवर महाऱेराच्या निकषात बसत नसलेल्या ठाणे जिल्ह्यातील तब्बल ४ हजार ३०३ एजंट्स ची नोंदणी महाऱेराकडून रद्द करण्यात आली आहे.
एजंटसचे हे महत्त्व लक्षात घेऊन या क्षेत्रात कार्यरत सर्व एजंटसना रेरा कायद्यातील महत्वाच्या तरतुदी माहीत असायला हव्यात. त्यांच्याकडून ग्राहकाला आदर्श विक्री करार, घर नोंदणी केल्यानंतर दिले जाणारे नोंदणी पत्र, चटई क्षेत्र, दोष दायित्व कालावधी अशासारख्या विनियामक तरतुदींची प्राथमिक माहिती देताना त्यात समानता, सातत्य आणि स्पष्टता असायला हवी. या माहितीच्या आधारेच ग्राहक घरखरेदीचा निर्णय घेतात. म्हणून ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवूनच महारेराने सर्व एजंट्सना प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केलेले आहे. ठाणे जिल्ह्यातील ४ हजार ३०३ एजंट्स काहींनी हे प्रमाणपत्र प्राप्त केले नाही आणि काहींनी त्यांच्या परवान्याचे नुतनीकरण केले नाही, म्हणून त्यांची नोंदणी रद्द करण्यात आलेली आहे.
ठाणे जिल्ह्यातील स्थावर संपदा क्षेत्रातील वेगळे स्थान लक्षात घेता देशाच्या बहुतेक राज्याच्या प्रमुख शहरातील एजंटसनी महारेराकडे नोंदणी केलेली आहे. यात नवी दिल्ली, गुरगाव, प्रयागराज, हैद्राबाद, बंगळुरू, कांचीपुरम, नैनिताल, गोवा, अहमदाबाद, पटना, जम्मू, इंदोर अशा सुमारे सव्वाशे ते दीडशे महत्त्वाच्या शहरांचा समावेश आहे.
नोंदणीकृत एजंट्सची संख्या
( कोकण – २१,०५० )
मुंबई शहर- ३४५७
मुंबई उपनगर- ८३६५
ठाणे- ६७६०
रायगड- १३४०
पालघर- १०८६
रत्नागिरी- ३१
सिंधुदुर्ग- १