ठाणे : राज्य शासन तसेच विविध महापालिका परिवहन सेवेच्या बसगाड्या प्रवाशांच्या तुलनेत अपुऱ्या पडत आहेत. यामुळे अनेक प्रवासी ओला, उबर या खासगी कंपनीच्या वाहतुकीचा पर्याय निवडत असून या कंपनीच्या वाहनांना प्रवाशांची मोठी मागणी असते. मात्र, दर कपात तसेच इतर विविध कारणांमुळे ओला, उबर चालकांनी अचानकपणे संप पुकारला आहे. ठाणे शहरातील नाक्यानाक्यांवर हे वाहनचालक एकत्रित जमून आंदोलन करत आहेत. यावेळी प्रवासी वाहतूक करणारी ओला किंवा उबरची वाहने अडवून त्यातील प्रवाशांना खाली उतरविले जात होते. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
मुंबई महानगर क्षेत्रात राज्य परिवहन सेवा तसेच विविध महापालिकांच्या परिवहन सेवेच्या बस गाड्या चालवण्यात येतात. या बस गाड्या संपूर्ण महानगर क्षेत्रातील विविध मार्गांवर चालविण्यात येतात. परंतु गेल्या काही वर्षात मुंबई महानगर क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. त्यामुळे या बसगाड्या प्रवासी संख्येच्या तुलनेत अपुऱ्या पडत आहेत. यामुळेच अनेक प्रवासी हे खाजगी वाहतुकीकडे वळाल्याचे चित्र दिसून येते. ओला, उबर या खासगी कंपनीमार्फत अशी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. यामध्ये रिक्षा, कार अशा वाहनांचा समावेश आहे. या कंपनीच्या वाहनांना प्रवाशांची मोठी मागणी असते. मात्र, दर कपात तसेच इतर विविध कारणांमुळे ओला, उबर चालकांनी अचानकपणे संप पुकारला आहे.
चालकांच्या मागण्या काय आहेत ?
ओला, उबर, रॅपिडो चे मनमानी दर बंद करून सरकारी मीटर दर करा. बाईक टॅक्सी कोणत्याही स्वरूपात नको. रिक्षा व कॅब परमिट वर मर्यादा आणा. रिक्षा टॅक्सी कल्याणकारी मंडळ कार्यान्वित करा. महाराष्ट्र गिग वर्कर्स ऍक्ट लागू करा, अशा प्रमुख मागण्यासाठी ओला आणि उबर चालकांनी संप पुकारल्याचे कारचालक विकी मदूर यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले.
रिक्षा आणि कारचे दर समानच
ओला आणि उबर मध्ये मोठ्या कारला ठाणे ते मुंबई विमानतळ या वाहतुकीसाठी १२०० रुपयांच्या पुढे भाडे मिळत होते. पण आता ७०० ते ८०० रुपये मिळतात. गेल्या सहा महिन्यांपासून हे दर कमी झाले आहेत, असे कारचालक अमोल सावंत यांनी सांगितले. ठाणे ते मुंबई विमानतळ या वाहतुकीसाठी छोट्या कारला पूर्वी ६०० ते ७०० रुपये भाडे मिळायचे. आता २३० रुपये वगैरे मिळते. या कार इतकेच भाडे रिक्षाला मिळते. सात लाखांची कार येते तर दीड लाखात रिक्षा येते. त्यांचे समान असतील तर कार चालकांचे नुकसान आहे, असे कार चालक ऋषीकेश चाळके यांनी सांगितले. तर, कधी कधी प्रवास कालावधी एक तास दाखविला जातो. पण, वाहतूक कोंडी झाली तर डी ते दोन तास प्रवास कालावधी होतो, त्यामुळे इंधन जास्त वाया जाते. परंतु भाडे दरात वाढ होत नाही, असेही चाळके यांनी सांगितले.
प्रवाशांचे हाल
ओला, उबर या खासगी कंपनीमार्फत अशी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. या कंपनीच्या वाहनांना प्रवाशांची मोठी मागणी असते. मात्र, दर कपात तसेच इतर विविध कारणांमुळे ओला, उबर चालकांनी अचानकपणे संप पुकारला आहे. ठाणे शहरातील नाक्यानाक्यांवर हे वाहनचालक एकत्रित जमून आंदोलन करत आहेत. यावेळी प्रवासी वाहतूक करणारी ओला किंवा उबरची वाहने अडवून त्यातील प्रवाशांना खाली उतरविले जात होते. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.