कल्याण: कल्याण पूर्वचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावरील गुन्हे प्रकरणात आरोपी असलेले आणि मागील दीड महिन्यापासून फरार असलेल्या वैभव गणपत गायकवाड यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. जी. इनामदार यांनी बुधवारी फेटाळला.

मंगळवारी या अटकपूर्व जामीन अर्जावर तक्रारदार महेश गायकवाड, सरकारी वकील आणि वैभव गायकवाड यांचे वकील यांचा न्यायालयासमोर तीन तास युक्तिवाद झाला होता. या युक्तिवादानंतर संध्याकाळी न्यायालयाने निर्णय राखून ठेवून बुधवारी निर्णय देणार असल्याचे जाहीर केले होते. न्यायालयाने तिन्ही बाजुच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेऊन बुधवारी वैभव गायकवाड यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. यामुळे वैभव यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. आता त्यांना जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात जावे लागणार आहे.

pune, case registered, Former Minister Balasaheb Shivarkar, House Grabbing, dhananjay pingale, police, pune news, pune House Grabbing case, marathi news,
माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह बाराजणांविरुद्ध गुन्हा दाखल
thane, Jitendra Awhad, mumbai High Court, quash the FIR
गुन्हा रद्द करण्यासाठी जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात
kejriwal arrest
न्यायालयांचा केजरीवाल यांना पुन्हा धक्का; तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ?
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी

हेही वाचा : “निवडणुकीआधीच महाविकास आघाडीचा डाव फिस्कटला”, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांची टीका

गेल्या महिन्यात आमदार गणपत गायकवाड यांनी शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यानंतर दाखल गुन्ह्यात इतर सहा आरोपींमध्ये वैभव यांचा सहभाग तक्रारदाराने दाखविला आहे. आमदार गणपत गायकवाड अटक प्रकरणात इतर पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आमदार गायकवाड तळोजा कारागृहात आहेत.

वैभव यांना अटक करण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू आहे. वैभव गायकवाड यांच्यावतीने न्यायालयात ॲड. सुदीप पासबोला, अनिकेत निकम, उमर काझी यांनी, महेश गायकवाड यांच्यावतीने ॲड. कासम शेख यांनी बाजू मांडली. वैभव विरोधात तक्रारदारांनी केलेले आरोप खोटे आहेत. त्यांच्या विरोधातील कलमे चुकीची आहेत. गणपत गायकवाड यांचा मुलगा म्हणून त्यांना चुकीच्या पध्दतीने या प्रकरणात गोवण्यात आले आहे. सीसीटीव्हीमधील चित्रीकरणात तफावत आहे, अशी सविस्तर माहिती वैभव गायकवाड यांच्या वकिलांनी न्यायालया समोर मांडली.

हेही वाचा : ठाण्यात राजन विचारे यांचे शिंदे गटासमोर आ‌व्हान, कल्याणमध्ये उमेदवाराचा शोध सुरूच

महेश यांच्या वकिलांनी कट रचून हा गोळीबार करण्यात आला आहे. महेश हे पोलीस दालनात असल्याने तेथे त्यांचा संरक्षणातील पोलीस नसेल आणि स्वसंरक्षणाची बंदूक नसेल याची जाणीव असल्याने दालनात महेशवर गोळीबार करण्यात आला. त्यामुळे वैभव या प्रकरणात आरोपी आहे त्यामुळे त्याचा जामीन फेटाळण्यात यावा, अशी मागणी महेशच्या वकिलाने केली. न्यायालयाने दोन्ही बाजुच्या वकिलांचे म्हणणे ऐकून वैभव गायकवाड यांचा जामीन फेटाळला. आता वैभव यांच्या जामिनाचे भवितव्य उच्च न्यायालयाच्या हातात आहे.