वसईत भरधाव ट्रकने पाच जणांना उडवलं, एकाचा मृत्यू

टेम्पो चालकाने दारूच्या नशेत हा अपघात केला आहे.

(सांकेतिक छायाचित्र)

वसईत भरधाव वेगात पळणाऱ्या टेम्पोने रस्त्यावरील पाच जणांना उडवलं. वसईच्या वालीव परिसरात शालीमार हॉटेल समोरील विठ्ठल मंदिराजवळ रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.

यात २४ वर्षीय फळविक्रेत्या तरुणाचा मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. टेम्पो चालकाने दारूच्या नशेत हा अपघात केला आहे. अपघात करून पळून जात असताना स्थानिक नागरिकांनी पकडून चालकाला वालीव पोलिसांच्या ताब्यात दिले.

Mh 04 cp 6513 असा टेम्पोचा नंबर आहे. रस्त्यावरील दोन बाईकस्वार, दोन पादचारी आणि एका फळ विक्रेत्याला टेम्पोने जोराची धडक दिली. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळावर पोहोचून रस्ता स्वच्छ केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: In vasai truck accident dmp