ठाणे : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर पत्ते खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरून राज्यात संताप व्यक्त होऊ लागला असून यातूनच अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तटकरे यांना माणिकराव कोकाटे यांच्याविरोधातील निवेदन देताना पत्ते फेकले. यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. यावर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत सत्तेचा इतका माज बरा नव्हे..! अशी टीका सरकारवर केली.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा विधीमंडळाच्या सभागृहातील व्हिडीओ असल्याचा दावा केला जात आहे. त्यावरून कोकाटे यांच्यावर टीकेचा भडिमार होऊ लागली आहे. यावरून राज्यात संताप व्यक्त होऊ लागला असून यातूनच रविवारी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूर दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांना अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार यांनी त्यांना निवदेन देताना पत्ते फेकले. सभागृहात गेम खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही याबाबत निवेदन त्यांनी निवेदन दिले. गेम खेळायचा असेल तर घरी खेळा… असे सांगत जोरदार घोषणाबाजी केली.
या प्रकारानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि मारहाण करणारे राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यावर टीका होत आहे. ही टीका पाहून चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत दिलगिरी व्यक्त केली. असे असले तरी या मारहाण प्रकरणाबाबत आता सर्वत्र प्रतिक्रिया उमटत आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत सत्तेचा इतका माज बरा नव्हे..! अशी टीका सरकारवर केली.
काय म्हणाले आव्हाड
सुनिल तटकरे यांना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बद्दल प्रश्न विचारताच राष्ट्रवादीचे पदाधिकार चिडले. प्रश्न विचारणाऱ्या छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. जनतेने आता या सत्ताधाऱ्यांना प्रश्न देखील विचारायचे नाहीत. नाहीतर आम्ही फोडून काढू असा संदेश,हा सत्ताधारी वर्ग देत आहे. त्यांना इतकच सांगणे आहे की, सत्तेचा इतका माज बरा नव्हे..! असे आव्हाड म्हणाले आहेत.