bihar election 2025 : ठाणे : बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असताना, काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बेगुसरायमध्ये एक वेगळाच अंदाज दाखवला. शनिवारी त्यांनी स्थानिक मच्छीमारांसोबत तलावात उडी मारून पारंपारिक पद्धतीने मासेमारीचा अनुभव घेतला. त्यांच्या या कृतीची चर्चा सुरू असतानाच, या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली.

तलावाच्या काठावर मोठ्या संख्येने गावकरी जमले होते. त्यांनी राहुल गांधींना जाळं टाकताना, मासे पकडताना आणि मच्छीमारांशी संवाद साधताना पाहून आनंद व्यक्त केला. प्रचार मोहिमेच्या मधल्या विश्रांतीत त्यांनी पाण्यात पोहण्याचाही आनंद घेतला. या वेळी काँग्रेस नेते कन्हैया कुमार आणि विकासशील इंन्सान पार्टीचे प्रमुख मुकेश सहनीही उपस्थित होते. दोघांनी राहुल गांधींसोबत तलावाच्या मध्यभागी जाऊन मच्छीमारांशी संवाद साधला.

या घटनेचा व्हिडिओ काँग्रेसने एक्स या माध्यमावर शेअर केला. त्यात राहुल गांधींनी मच्छीमारांशी त्यांच्या रोजच्या संघर्षांबद्दल आणि समस्यांबद्दल चर्चा केली. स्थानिक लोकांशी जोडणारा हा प्रयत्न त्यांच्या प्रचार मोहिमेचा एक भाग असल्याचे बोलले जात आहे. २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना, राहुल गांधींच्या या अनोख्या प्रचारशैलीने चर्चेला नवीन वळण मिळालं आहे. त्यांच्या मच्छीमारीतील सहभागामुळे प्रचार मोहिमेत मानवी स्पर्श आणि जनसंपर्काचा नवा अध्याय जोडला गेल्याचं राजकीय वर्तुळात मानलं जात आहे.

काय होती घटना

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारच्या बेगूसराय जिल्ह्यात स्थानिकांसोबत मासेमारीचा आनंद घेतला. निवडणूक प्रचार मोहिमेच्या मधल्या विश्रांतीत त्यांनी तलावात उडी घेत पोहण्याचाही आनंद लुटला. या प्रसंगी कॉंग्रेस नेते कन्हैया कुमारदेखील उपस्थित होते. मोठ्या संख्येने स्थानिक मच्छीमारही तलावाच्या काठावर जमले होते, त्यापैकी काहींनी नेत्यांसोबत पाण्यात उडी घेतली. यानंतर राहुल गांधीही कमरेपर्यंत पाण्यात उतरून पकडलेल्या मास्यांची पाहणी करताना दिसले.

आव्हाड यांची प्रतिक्रिया

दरम्यान, या घटनेच व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ” एक ही तोहं दिलं है….कितनी बार….बार बार जितोगे…ये जो देस है मेरा स्वदेस है मेरा”, असा भावनिक प्रतिक्रिया आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.