कल्याण पश्चिमेतील बारावे येथील गेल्या चार वर्षांपूर्वी सुरु केलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागली. प्रक्रिया केंद्राभोवतीचा उन्हाने तप्त झालेला सुका कचरा आगीत जळू खाक झाला. आगीच्या झळा प्रक्रिया केंद्राला लागल्यामुळे प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील कचरा एकाच ठिकाणी न ठेवता, त्याची प्रभागवार पध्दतीने विल्हेवाट लावावी या उद्देशातून प्रशासनाने शहराच्या विविध भागात बारा प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. त्यामधील पाच ते सहा प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. बारावे प्रकल्प पूर्ण क्षमतेने घनकचरा विभागाकडून चालविला जातो. कल्याण पश्चिमेतील सुका कचरा येथे आणला जातो. सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन खत तयार केले जाते. आधारवाडी कचराभूमी सारखे या केंद्रात मोठे कचऱ्याचे ढीग नाहीत. तरी आग लागल्याने घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan barave waste management project catches fire suspicion on the cause of fire
First published on: 01-04-2022 at 13:52 IST