कल्याण : शौचालय साफसफाई देयकाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी १५ हजारांच्या लाचेची मागणी करणारा कल्याण डोंबिवली महापालिकेचा प्रभारी कार्यकारी अभियंता बाळासाहेब जाधव (५६) याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तक्रारदार हे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या साफसफाईचे ठेके घेतात. त्यांच्या ७ लाख ९८ हजार रुपयांच्या शौचालय साफसफाई देयक कागदपत्रांवर बाळासाहेब जाधव यांची स्वाक्षरी हवी होती. यासाठी जाधव याने ठेकेदाराकडून १६ हजार रुपयांची लाच मागितली. ठेकेदाराने याची माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. या तक्रारीची पडताळणी करून ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १५ हजार रुपयांची लाच घेताना जाधव याला रंगेहात पकडले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan dombivli bribe corrupt executive engineer detained akp
First published on: 18-02-2020 at 06:52 IST