कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या अखत्यारितील बालवाड्यांमध्ये लहान मुलांना शाळेत खेळण्यासाठी ठेकेदाराकडून पुरवठा करण्यात आलेली खेळणी अतिशय निकृष्ट दर्जाची आहेत, अशा तक्रारी बालवाडी शिक्षकांनी केल्या आहेत. याविषयी उघडपणे तक्रार केली तर पालिकेकडून कारवाई होईल या भीतीने कोणी शिक्षिका याविषयी तक्रार करण्यास किंवा उघडपणे बोलण्यास तयार नाही.

कल्याण डोंबिवली पालिकेच्या अखत्यारित एकूण ४२ बालवाड्या आहेत. या बालवाड्यांमध्ये परिसरातील लहान मुले प्रवेश घेतात. या मुलांच्या मनोरंजनासाठी पालिकेच्या महिला आणि बालकल्याण विभागाकडून बालवाड्यांना मुलांना शाळेत खेळण्यासाठी लहान तीन चाकी सायकल, विविध प्रकारचे प्लास्टिकचे पक्षी, घसरगुंडी, मुलांचे कौशल्य विकास करणारे प्लास्टिकच्या वस्तुंचे खेळ ही खेळणी पुरवली जातात.

न्यायालयीन प्रक्रियेच्या दुरुपयोगासाठी जनहित याचिका नको; याचिकाकर्त्यांना ५० हजार रुपयांचा दंड
Black market, pune RTO, brokers,
पुणे आरटीओत ‘काळाबाजार’! दलालांनी उभारली पर्यायी यंत्रणा; कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप

हेही वाचा : बाळासाहेबांच्या मुंबईतील स्मारकाप्रमाणेच आनंद दिघेंचे ठाण्यातील महापौर निवासात स्मारक

गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत पालिकेच्या अखत्यारितील कल्याण, डोंबिवलीतील बालवाड्यांना महिला आणि बाल कल्याण विभागाकडून खेळण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. या मधील बहुतांशी खेळणी निकृष्ट दर्जाची, कचकड्या प्लास्टिकची असल्याच्या तक्रारी बालवाडी शिक्षिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केल्या आहेत. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी बालवाडीतील मुलांचे पालक आणि बालवाडी शिक्षिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा : डोंबिवलीतील ५० कोटींच्या टीडीआर घोटाळ्याची पुढील आठवड्यात हायकोर्टात सुनावणी

लहान मुले खेळण्यांची खूप आदळआपट न करता त्या खेळण्या बरोबर खेळत असतात. तीन चाकी सायकलवर बसल्यानंतर ती बालवाडीतील खोलीत फिरवली जाते. या सायकलवर बसणाऱ्या मुलांचे वजन आटोपशीर असते. तरीही नव्याने मिळालेल्या खेळण्यांची तोडमोड झाली आहे. प्लास्टिकचे पक्षी असलेल्या खेळण्यांच्या चोची, पंख तुटले आहेत. सायकलची चाके निखळली आहेत, अशा तक्रारी बालवाडी शिक्षकांनी केल्या आहेत.

बालवाडीत दिलेल्या खेळण्यांशी खेळताना मुलांकडून काही खेळण्यांची तोडमोड झाली आहे. ती खेळणी बदलून देण्याची सूचना संबंधित ठेकेदाराला दिली आहे. पालिकेच्या ४२ बालवाड्या तेथे आहेत. तेथे पालिकेकडून खेळणी पुरवली जातात.

प्रशांत गवाणकर (समाज विकास अधिकारी, कल्याण)