कल्याण– कल्याण पश्चिमेत राहत असलेली नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेली एक २४ वर्षाची महिला पोलीस कर्मचारी दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. या महिलेच्या कुटुंबीयांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. नवी मुंबईतील एका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली ही महिला पोलीस नियमित कामावरुन रात्रीच्या वेळी घरी परत येत होती. दोन दिवस ती घरी न आल्याने कुटुंबीयांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार केली आहे. ही महिला कर्मचारी कामावर येत नसल्याची माहिती आता पुढे येत आहे.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये शिंदे समर्थकांकडून भाजपा कार्यकर्त्यांना बेदम मारहाण, कमळ चिन्ह रंगविण्यावरून वाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ध्वजारोहण कार्यक्रमाला ती उपस्थित नव्हती. बाजारपेठ पोलिसांनी या महिलेचा शोध सुरू केला आहे. पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेला एक पुरूष पोलीस कर्मचारी देखील दोन दिवसांपासून गायब आहे. त्याचे या महिले बरोबर प्रेमाचे संबंध आहेत.तो कर्मचारी देखील पोलीस ठाण्यात कर्तव्यावर येत नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडला असण्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. या प्रकारामुळे दोन्ही कडील कुटुंबीयांची चिंता मात्र वाढली आहे.