Thane collector ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे नियत वयोमानानुसार ३१ जुलै रोजी सेवानिवृत झाले. त्यांनी राज्य शासनाच्या विविध विभागातील प्रशासकीय सेवेत ३१ वर्ष काम केले. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात सेवापूर्ती सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. परंतु शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे ( kedar dighe ) यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमुळे शिनगारे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा काहीसा वादात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

राज्यातील सत्ताबदलानंतर विविध जिल्ह्यातील प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरु झाले. यामध्ये ठाणे जिल्हाधिकारी पदी असलेल्या राजेश नार्वेकर यांच्या जागी ठाणे जिल्हाधिकारी म्हणून अशोक शिनगारे यांची वर्णी लागली होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून शिनगारे यांची ठाणे जिल्हाधिकारी पदी म्हणून वर्णी लागल्याचे बोलले जात होते. तर, राजेश नार्वेकर हे ठाकरे गटाचे संजय राऊत यांचे व्याही असल्याने यांची बदली झाली असल्याच्या ही चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. यामुळे ठाणे जिल्हाधिकारी पद चांगलेच चर्चेत आले होते.

भावुक झाले होते

ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे नियत वयोमानानुसार गुरुवार, ३१ जुलै रोजी सेवानिवृत झाले. या निमित्ताने ठाणे जिल्ह्यातील सर्व प्रसारमाध्यम प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात अनौपचारिक संवाद साधला. यावेळी ते भावुक झाले होते. चांगले सहकार्य केल्या बदल जिल्हाधिकारी शिनगारे यांनी पत्रकारांचे आभार मानले होते तर, गेले पावणे तीन वर्षात वेळेअभावी मला पत्रकारांशी संवाद साधता येऊ शकला नाही, याबाबत खंत देखील व्यक्त केली होती.

सेवापूर्ती सत्कार सोहळा वादात

ठाण्याचे जिल्हाधिकारी म्हणून यशस्वी कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले. त्यांनी राज्य शासनाच्या विविध विभागातील प्रशासकीय सेवेत ३१ वर्ष काम केले. अशोक शिनगारे यांच्या सेवापूर्ती निमित्त ठाणे जिल्हा परिषदतर्फे जिल्हा परिषद कार्यालयात गौरव समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे अधिकारी, विभागप्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून आपल्या स्नेहपूर्ण भावना आणि कृतज्ञता व्यक्त केली होती. त्यापाठोपाठ ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे गुरुवारी सायंकाळी सेवापूर्ती सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक नेते, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. पण तो आता वादात सापडण्याची चिन्हे आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केदार दिघे यांची पोस्ट चर्चेत

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट केली आहे. अशोक शिनगारे यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रमाच्या काही तास आधी केलेल्या पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. या पोस्टमध्ये ” वसई विरार आयुक्तांचा निरोप समारंभ झाला आणि त्यांच्या संपत्तीचे घबाड ईडीला सापडले. मुळात आयुक्त, जिल्हाधिकारी यांचे निरोप समारंभ राजकीय लोकांनी करणे म्हणजे हा त्यांच्या हितसंबंधांचा भाग म्हणायचं का? जिल्हाधिकारी ठाणे यांचाही निरोप समारंभ दिमाखात होणार आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी का?, असा प्रश्न केदार यांनी उपस्थित केला आहे.