लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: भारतीय वास्तुविशारद संस्थेच्या कल्याण डोंबिवली शाखेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ वास्तुविशारद केशव चिकोडी यांची निवड करण्यात आली. तीन वर्ष चिकोडी या पदावर कार्यरत असतील. संस्थेची इतर कार्यकारिणीही यावेळी जाहीर करण्यात आली.

डोंबिवली जीमखाना येथे आयोजित या पदग्रहण कार्यक्रमाला वास्तुविशारद संस्थेच्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वास्तुविशारद विलास अवचट, संस्थेचे महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष वास्तुविशारद संदीप प्रभू उपस्थित होते. ‘एमसीएचआय’ कल्याण-डोंबिवली शाखेचे पदाधिकारी, सदस्य, कल्याण डोंबिवली पालिकेतील स्थापत्य अभियंते, वकील उपस्थित होते.

हेही वाचा… कल्याण डोंबिवली पालिकेच्या उल्हास नदी काठच्या पाणी पुरवठा केंद्रात पाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्ष- वास्तुविशारद धनश्री भोसले, सचिव- उदय सातवळेकर, खजिनदार- विनायक पाटणेकर, कार्यकारी समिती सदस्य- वास्तुविशारद व सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील, अंकुर शेट्ये, संदीप परांजपे, अनिरुध्द दास्ताने, विवेक विळेकर यांचा समावेश आहे.
मावळते अध्यक्ष ज्येष्ठ वास्तुविशारद शिरीष नाचणे यांनी अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामांचा आढावा घेतला. संस्थेच्या माध्यमातून हाती घेऊन पूर्ण केलेल्या सामाजिक प्रकल्पांची माहिती दिली.