ठाणे : लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. मी मुख्यमंत्री असताना ज्या योजना आणल्या होत्या. तसेच देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आमच्या टीमने जे वचन दिले आहे. ते टप्प्याटप्प्याने पुढील काळात पूर्ण करणार असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी नाशिकच्या माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह नाशिकमधील ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. लाडकी बहीण योजनेला निधी मिळणार नाही असे विरोधक म्हणत होते. पण निधी मिळाला. ही योजना सुरु राहणार आहे.

विरोधकांचा तुम्ही सुफडा साफ केला होता. ते लोक उलट-सुलट चर्चा करत असतात. त्यांच्या चर्चांना आपल्याला उत्तर द्यायची गरज नाही. आपण आपले काम करु असेही शिंदे म्हणाले. हे सरकार गोरगरिबांचे, लाडक्या बहीणींचे, लाडक्या भावांचे, शेतकऱ्यांचे आहे. येथे सर्वांच्या अडचणी सोडविल्या जातील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अडीच वर्षांत आपण अनेक प्रकल्प, कल्याणकारी योजना आणल्या. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच इतके मोठे यश मिळाले नव्हते. ते महायुतीला मिळाले. यामध्ये सर्वांत मोठा वाटा लाडक्या बहिणींचा असल्याचे ते म्हणाले.