उल्हासनगर शहरातील वर्दळीच्या अशा गोल मैदान परिसरात इमारतीचा स्लॅब कोसळून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कॅम्प दोन भागातील गौल मैदान परिसरात असलेल्या कोमल पार्क इमारतीत पाचव्या मजल्यावरील ५०२ या सदनिकेत दुरूस्तीचे काम सुरू होते. दुरूस्ती होत असतानाच अचानक स्लॅब कोसळल्याने मजूराचा मृत्यू झाला आहे. तर एक मजूर जखमी झाला आहे.

हेही वाचा – डोंबिवली : शिळफाटा रस्त्यावरील काटई चौकातील कोंडी सोडविण्यासाठी रस्ते कामाला सुरुवात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोल मैदान जवळील कोमल पार्क ही इमारत धोकादायक असल्याने यापूर्वीच तीन वेळा नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या, अशी उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे. ही इमारत ही सी २ बी या अर्थात दुरूस्ती करण्याची गरज असलेल्या प्रकारात मोडत होती. त्यामुळे तिची दुरुस्ती करणे आवश्यक होते. मात्र येथील रहिवाशांनी याकडे साफ दुर्लक्ष केल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. या इमारतीतील सदनिका क्रमांक ५०२ मधील जतीन चैलानी यांनी स्वतःच्या स्तरावर अंतर्गत दुरुस्ती करत असताना ही घटना घडली. यावेळी दोन मजूर दाबले गेले. त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या इमारतीला २ ऑगस्ट २०२१, ४ मे २०२२ तसेच १४ जून २०२२ रोजी धोकादायक असल्याच्या नोटिसा पालिकेने बजावल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच पालिकेचे आय़ुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर व सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी तातडीने भेट देऊन नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन जवानांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम व इतर पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते.