सध्याच्या धावपळीच्या युगात कमीतकमी वेळेत मिळणाऱ्या चमचमीत आणि चटकदार खाद्यपदार्थाच्या शोधात सगळेच असतात. कारण रोज रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यावर आपली पावलं आपसूकच अशा ठिकाणांकडे वळतात जिथे काहीतरी नवीन आणि चवदार पदार्थ मिळतात. अशा चोखंदळ खाणाऱ्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी वसईतील ‘द लेमन ग्रास’ हा नक्कीच उत्तम पर्याय ठरू शकतो.

स्वत: काहीतरी करावे, खाद्यपदार्थाच्या या चढाओढीत आपले नाव असावे, या उद्देशाने वसईतील अफताफ आणि अरबाज यांनी मिळून पापडी चर्चसमोर ‘द लेमन ग्रास’ नावाचे हॉटेल सुरू केले. जेव्हा चायनीजच्या पदार्थाची चव सर्वाच्या जिभेवर रेंगाळण्यास सुरुवात झाली होती, त्या काळापासून म्हणजे साधारण दोन वर्षांपासूनच त्यातील नवनवीन प्रयोगातून साकारलेल्या नावीन्यपूर्ण पदार्थाची भेट अफताफ आणि अरबाज यांनी वसईकरांसाठी आणली होती. त्यापैकीच पॅनस्केप, तायपॅन, सेस्मिहॉट, थायकुंग, सापोपॉट राइस हे सर्व पदार्थ ‘द लेमन ग्रास’ मधील आगळीवेगळी अशी वैशिष्टे आहेत. शिवाय हे पदार्थ वसईत कुठेच मिळत नसल्याचा दावा ही ‘द लेमन ग्रास’चे मालक अरबाज यांचा आहे.

येथे कोणताही पदार्थ तयार करून ठेवला जात नाही. मागणी येईल त्याप्रमाणे पदार्थ तयार केले जातात. त्यामुळे ग्राहकांना नेहमी गरमागरम पदार्थच मिळतात. पदार्थाची चव टिकवण्यासाठी चिकन, मटण, भाज्या यांची साठवण न करता आवश्यकतेनुसारच बाजारहाट केली जाते. त्यामुळे खवय्यांना जर खास चायनीज आणि भारतीय पद्धतीच्या पदार्थाचा आस्वाद घ्यायचा असेल तर ‘द लेमन ग्रास’ हा नक्कीच सर्वोत्तम पर्याय ठरतो.

चौकट-

सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणाची सोय

या पदार्थाशिवाय तंदुरीचिकनचे वेगवेगळे पदार्थ देखील मिळतात. बिर्यानीपासून भारतीय पद्धतीचे पदार्थदेखील येथे उपलब्ध आहेत. त्यामध्ये चिकन सुका, चिकन हंडी, चिकन मराठा, चिकन हैद्राबादी एवढेच नव्हे तर आगरी चिकन, कोळंबी मसाला, मालवणी चिकन, डाल तडका, चणा मसाला, दाल मखनी, मेथी मटार मसाला हे वेज आणि नॉनव्हेज पदार्थ उपलब्ध आहेत. येथे मिळणाऱ्या पदार्थाचे वैशिष्टय़ म्हणजे सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत हे पदार्थ आपण कधीही खाऊ  शकतो. तसेच येथे मिळणाऱ्या ‘लेमन कोरिएंटर’ सूपची चव आपल्याला बाहेर कुठेच मिळणार नाही.

परदेशातील सॉसचा आस्वाद

या हॉटेलमध्ये मिळणारा ‘पॅनस्केप’ हा पदार्थ बनविण्यासाठी चायनिस सॉस, चिकन आणि इतर पदार्थाच्या मिश्रणातून तयार केला जातो. व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये देखील हा पदार्थ उपलब्ध असून स्टाटर्ससाठी चांगला पर्याय आहे. तसेच तायपॅन, सेस्मिहॉट, थायकुंग, सापोपॉट राइस हे सर्व पदार्थ बनवण्यासाठी लागणारे चायनीज सॉसेस हे थायलंड आणि दुबई येथून मागवत असल्याचे अफताफ यांनी सांगितले.

या सॉसेसमुळे येथील चायनीज पदार्थाना चांगली चव येते, हेच या हॉटेलचे वैशिष्टय़ आहे. तर मुख्य

म्हणजे अजिनोमोटोशिवाय चायनीज पदार्थ हे अपुरे असतात. परंतु या हॉटेलमध्ये कोणत्याच पदार्थामध्ये अजिनोमोटो टाकत नसल्यामुळे या पदार्थाचा दर्जा टिकून राहतो.

’ कुठे ? – ‘द लेमन ग्रास’, पापडी चर्चसमोर, धमामि वाडी, टी. बी.कॉलेजच्या बाजूला, वसई पश्चिम .

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

’ दुसरी शाखा :  ५ डॅरी व्हीला, मेरी व्हीला, महाराष्ट्र शाळेसमोर, वसई पश्चिम.

’ वेळ : दुपारी : ११.३० ते ३.३०

: रात्री : ६.०० ते १२.००