बचत, परताव्याचे लक्ष्य काय असावे?

‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रमांतर्गत डोंबिवलीत रविवारी मार्गदर्शन

लोकसत्ता अर्थसल्लाउपक्रमांतर्गत डोंबिवलीत रविवारी मार्गदर्शन

वस्तू व सेवा करप्रणालीच्या (जीएसटी)  प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतर शेअर बाजार, म्युच्युअल फंड, विमा, मुदत ठेवी, सोने, घर आदीतील गुंतवणुकीबाबत काय धोरण ठेवावे? या बहुविध पर्यायातून अधिक परताव्याची आस धरावी काय? सेवा कराच्या रूपाने गुंतवणुकीकरिता अधिक किंमत आता मोजावी लागत असताना सावध व निश्चित लाभाची गुंतवणूक कशी साध्य करता येईल? सध्याच्या प्रचंड आर्थिक घडामोडींच्या काळात योग्य नियोजन कसे करावे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ‘लोकसत्ता अर्थसल्ला’च्या मंचावरून डोंबिवलीकरांना येत्या रविवारी मिळणार आहेत.

निमित्त आहे ‘रिलायन्स म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ गुंतवणूकपर मार्गदर्शनाच्या नव्या पर्वाचे. यंदाच्या या पर्वातील पहिले सत्र बोरिवली पार पडले होते. दुसरे सत्र रविवार, २ जुलै २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता ब्राह्मण सभा  सभागृह, टिळक मार्ग, कृष्ण राधा सोसायटी, डोंबिवली (पूर्व) येथे होईल.

अर्थनियोजन तसेच शेअर बाजारातील व्यवहार यावर तज्ज्ञ वक्ते या कार्यक्रमात मार्गदर्शन करतील.‘लोकसत्ता अर्थ वृत्तान्त’चे स्तंभलेखक अजय वाळिंबे आणि वसंत माधव कुलकर्णी हे यावेळी गुंतवणूकदारांच्या शंकांचे निरसनही करतील. कार्यक्रमासाठी प्रवेश सर्वासाठी खुला आणि विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.

शुक्रवारी मध्यरात्रीपासून देशभर लागू होत असलेल्या वस्तू व सेवा करप्रणालीनंतर गुंतवणुकीच्या, बचतीच्या सवयी कशा लावून घ्याव्यात, एरवी एप्रिलपासून सुरू करणारे आर्थिक नियोजन असे वित्त वर्षांच्या मध्याला येऊन ठेपल्यानंतर परतावा व लक्ष्य कसे गाठावे याबाबत या मार्गदर्शनपर सत्रात सोदाहरणासह सांगितले जाईल.

untitled-19

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Loksatta arth salla in thane

ताज्या बातम्या