शनिवारपासून ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे :  विविध वस्तूंच्या खरेदीसोबत आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी देणारा ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ येत्या शनिवारपासून पुन्हा ठाणे, नवी मुंबईकरांच्या भेटीला येत आहे. रिजन्सी ग्रुप आणि ठाणे महापालिका यांच्या सहकार्याने होणाऱ्या या खरेदी उत्सवात ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली शहरांतील अनेक दुकाने सहभागी होत आहेत. या दुकानांतून मनाजोगती खरेदी करून ग्राहकांना बक्षिसे जिंकता येणार आहेत.

खरेदीच्या उत्साहाला बक्षिसांचे कोंदण चढवणाऱ्या ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’चे यंदा सातवे वर्ष आहे.  शनिवार, २५ जानेवारीपासून सुरूहोणाऱ्या या खरेदी उत्सवात रविवार, १६ फेब्रुवारीपर्यंत सहभागी होण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. या खरेदी उत्सवाच्या अखेरीस भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येणार असून पहिल्या भाग्यवान विजेत्याला पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे.

कसे सहभागी व्हाल?

’ लोकसत्ता ठाणे शॉपिंग महोत्सवात सहभागी दुकानात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या बक्षिसांची संधी मिळू शकेल.

’ सहभागी दुकानांमध्ये ३०० रुपयांपेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना देयक दिल्यानंतर दुकानदारांकडून त्यांना एक कूपन दिले जाईल.

’ ते कूपन भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे.

’ अर्धवट माहिती भरलेली कूपन फेटाळले जातील.

’ ‘ड्रॉपबॉक्स’मध्ये दररोज जमा होणाऱ्या कूपनमधून दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाईल आणि त्याचे नाव ‘लोकसत्ता ठाणे’ आणि ‘लोकसत्ता महामुंबई’मधून प्रसिद्ध केले जाईल.

’ या स्पर्धेकरिता नियम आणि अटी लागू असतील.

महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या दुकानदारांनी पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा.

’ कृष्णा नागरे- ९८३३१४७८७१

’ गोविंद भोसले- ९८१९८१४२५३

’ गौरव याज्ञिक- ७५०६५२९०२०

’ हर्षद गोफणे- ९७६९१३३३४३

’ प्रदीप पंजाबी- ९८२१५३४६७७ (नवी मुंबई)

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta thane shopping festival 2020 from saturday zws
First published on: 22-01-2020 at 02:44 IST