ठाणे: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामादरम्यान खांबावर गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी घोडबंदर मार्गावर पुढील चार दिवस मोठे वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत.

कासारवडवली आणि कापुरबावडी भागात हे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे कासारवडवली भागात शुक्रवारी रात्री ११. ५५ वाजता ते शनिवारी सकाळी ५ वाजेपर्यंत आणि कापुरबावडी भागात शनिवार रात्री ११ ते रविवार सकाळी १० वाजेपर्यंत आणि रविवार रात्री ११ ते सोमवार सकाळी ६ वाजेपर्यंत लागू असतील.

कासारवडवली भागात असे असतील वाहतूक बदल

प्रवेश बंद – ठाणे घोडबंदर वाहिनी वर डोंगरीपाडा येथे स्टिल गर्डर चढवितांना घोडबंदर च्या दिशेने जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना पातलीपाडा उड्डाणपुल उतरणीच्या पुढे ‘प्रवेश बंद’ असेल. ही सर्व प्रकारची वाहने पातलीपाडा उड्डाणपुल उतणीच्या पुढे खुला केलेल्या मध्य दुभाजक कट मधुन विरुद्ध दिशेने जाऊन वाघबिळ पुला पुर्वी ओपन केलेल्या कट मधुन जाउन पुढे मुख्य रस्त्यामार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद – ठाणे घोडबंदर वाहिनी वरून विरुद्ध दिशेने स्टिल गर्डरची वाहतुक करतांना पातलीपाडा पुला लगत स्लीप रोडने हिरानंदनी इस्टेट कडे जाणाऱ्या सर्व वाहनांना पातलीपाडा ब्रिज चढणी जवळ ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.पर्यायी मार्ग – ठाणे घोडबंदर वाहिनी वरून विरुद्ध दिशेने स्टिल गर्डरची वाहतुक करतांना हिरानंदनी इस्टेट कडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी पातलीपाडा पुलावरून जाउन वाघबिळ पुला खालुन इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद – ठाणे घोडबंदर वाहिनी वरून विरुद्ध दिशेने स्टिल गर्डरची वाहतुक करतांना मानपाडा पुळलगत स्लीप रोडने मानपाडा ब्रिज खाली तसेच टिकुजीनीवाडी कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मानपाडा पूल चढणी जवळ ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – ठाणे घोडबंदर वाहिनी वरून विरुद्ध दिशेने स्टिल गर्डरची वाहतुक करतांना मानपाडा पुला खाली जाणाऱ्या सर्व वाहनांनी पातलीपाडा पुला खालुन तसेच टिकुजीनीवाडी कडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी मुल्ला बाग मार्गे इच्छित स्थळी जातील. हे वाहतूक बदल शुक्रवारी रात्री ११. ५५ वाजता ते शनिवारी सकाळी ५ वाजेपर्यंत लागू असतील.

कापुरबावडी भागात असे असतील बदल

प्रवेश बंद – ठाणे घोडबंदर स्लीप रोडवरुन कापुरबावडी सर्कल मार्गे घोडबंदरचे दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कापुरबावडी सर्कल येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग – सदरच्या मार्गावरुन जाणारी सर्व प्रकारची वाहने ही कापुरबावडी सर्कल येथुन पुला खालुन नळपाडा सिग्नल येथुन उजवीकडे वळण घेवुन, नंदीबाबा चौक, ढोकाळी मार्गे इच्छित स्थळी जातील. ब) सदर मार्गावरुन जाणारी सर्व प्रकारची वाहने ही रवि स्टील नाका येथुन डावे बाजुस वळण घेवुन पोखरण रोड नं.२,गांधी चौक येथुन उजवे बाजुस वळण घेवुन खेवरा सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद – नळपाडयातुन बाहेर येवुन तत्वज्ञान विद्यापीठ मार्गे घोडबंदरचे दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना नळपाडा पाईप लाईन येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पर्यायी मार्ग – सदर मार्गावरुन जाणारे सर्व प्रकारची वाहने नळपाडा पाईप लाईन येथुन यु टर्न घेवुन नळपाडा येथुन इच्छित स्थळी जातील. हे वाहतूक बदल शनिवार रात्री ११ ते रविवार सकाळी १० वाजेपर्यंत आणि रविवार रात्री ११ ते सोमवार सकाळी ६ वाजेपर्यंत लागू असतील.