scorecardresearch

बारमध्ये बाहेरील दारू आणल्याने व्यवस्थापकाची तरुणाला मारहाण

त्यातील दारू पिण्यास मोहित याने सुरुवात केली असता बार व्यवस्थापक अमित याने मोहितीला दारू पिण्यास मज्जाव केला.

बारमध्ये बाहेरील दारू आणल्याने व्यवस्थापकाची तरुणाला मारहाण
प्रातिनिधीक छायाचित्र

उल्हासनगर : बारमध्ये बाहेरील दारू आणल्याने एका २५ वर्षीय तरुणाला बार व्यवस्थापकाने लोखंडी सळीने जबर मारहाण केल्याचा प्रकार उल्हासनगर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी बार व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे. उल्हासनगर – १ मधील शहाड फाटक येथे स्वाती या नावे एक बार आहे. या बारमध्ये कल्याण येथे राहणारा मोहित द्विवेदी हा २५ वर्षीय तरुण दारू पिण्यासाठी अनेकवेळा जात असतो. याच पद्धतीने मोहित हा दोन दिवसांपुर्वी बारमध्ये दारू पिण्यासाठी गेला. मात्र बारमध्ये जाताना मोहित याने आपल्या समवेत दारूची एक बाटली देखील नेली होती.

हेही वाचा : डोंबिवली : पूर्व रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांकडून एक लाखाचे सामान जप्त

त्यातील दारू पिण्यास मोहित याने सुरुवात केली असता बार व्यवस्थापक अमित याने मोहितीला दारू पिण्यास मज्जाव केला. बारमध्ये बाहेरून दारू आणून पिण्यास मनाई आहे सांगून मोहितचा हात धरून त्यास बार बाहेर काढले. त्यानंतर अमित याने मोहितला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच जवळच असलेल्या लोखंडी सळीने त्याच्या हातावर, पायावर मारहाण केली. या मारहाणीत मोहित हा जबर जखमी झाला आहे. यांनतर मोहित याने लागलीच प्रथमोपचार घेत उल्हासनगर पोलीस ठाण्यात बार व्यवस्थापक अमित याच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अमित याच्या विरोधात मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या