ठाणे : माही खान नावाच्या व्यक्तीने एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. यामध्ये माही खान याने दावा केला होता की, त्याला मराठी बोलण्यास भाग पाडले जात होते. या प्रकरणानंतर आता सोशल मिडीयावर विविध प्रतिक्रिया नोंदविल्या जात आहे.

मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी याप्रकरणातील महिलेला मनसे कार्यालयात बोलावून नेमके प्रकरण काय झाले आहे त्याचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, संबंधित महिला ही बंगाली भाषिक आहे. त्यामुळे माही खान याच्या दाव्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्याच्या चॅनलला रिपोर्ट मारण्याचे आवाहन अविनाश जाधव यांनी केले.

नुकताच एक प्रकार समोर आला आहे. माही खान नावाच्या एका व्यक्तीने त्याच्या समाजमाध्यावर एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्यामध्ये त्याने दावा केला आहे की त्याला एका महिलेने मराठी बोलण्यास भाग पाडले जात आहे. हे प्रकरण विमानात झाल्याचे दिसते आहे. या घटनेनंतर माही खान याने व्हिडीओ तयार करुन समाजमाध्यमावर मोठ्याप्रमाणात प्रसारित केले.

मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी संबंधित महिलेला ठाण्यातील मनसेच्या कार्यालयात बोलावून प्रकरण जाणून घेतले. त्यानंतर अविनाश जाधव यांनी माही खान याला शोधून मराठी बोलण्यास भाग पाडण्याचा इशारा दिला.

महिलेचे नेमके काय म्हणणे आहे

आमचे सकाळचे विमान होते. माही खान हा विमानामध्ये चित्रीकरण करत होता. त्यावेळी माही याने अचानक त्याचे आसन मागे केले. मी त्याला ‘हळू-हळू भाऊ’ असे म्हणाली असता त्याने मराठीत का बोलले असे म्हणत वाद घातला. त्याने कॅमेरा कधी सुरु केला हे देखील माहित नव्हते.

मी बंगाली भाषिक आहे. पण मी मराठी चांगले बोलते. त्याने हिमंत असेल तर समोर येऊन बोलावे असे त्या म्हणाल्या. याप्रकरणानंतर महिलेने दावा केला आहे की त्यांची बदनामी झाली असून त्यांना नोकरी देखील गमवावी लागली आहे.

मराठी प्रेमींनो रिपोर्ट करा

अविनाश जाधव यांनी या प्रकरणानंतर संताप व्यक्त केला. महिला तीन दिवसांपासून खूप डिस्टर्ब आहेत. त्या भिकारड्याला त्याचे व्हूव वाढत आहेत म्हणून तो व्हिडीओ बनवत आहे. याला आम्ही सोडणार नाही. यांच्या आजोबा, बापाला आम्ही पोसले आहे.

त्यानंतरही मराठी बोलले जाणार नाही असे म्हणत असेल तर कान पकडून मराठी बोलायला त्याला लावेल. त्याच्या चॅनलला मराठी प्रेमींनी रिपोर्ट करावे असेही जाधव म्हणाले. या भिकारड्याने पैसे कमविण्यासाठी महिलेचा जाॅब घालवला. याला शोधून कोंबडा बसविला नाही तर माझे अविनाश जाधव नाव नाही असा इसारा जाधव यांनी दिला.