थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानच्या धर्तीवर ठाण्यातील कळवा येथे बच्चेकंपनीसाठी टॉयट्रेन सुरु करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्यावतीने कळवा खाडीकिनारी असलेल्या नक्षत्रवनात ही टॉयट्रेन उभारण्यात आली आहे. त्यामुळे ऐन सुट्टीच्या कालावधीत रंगीबेरंगी कारंज्याच्या सानिध्यात मिनी ट्रेनच्या सफरीचा आनंद लुटण्यासाठी चिमुकल्यांची गर्दी वाढताना दिसत आहे. उद्यानातील वन्यप्राण्यांचे दर्शन घेत गोलाकार फिरणाऱ्या या टॉयट्रेनसाठी इथे छोटेखानी रेल्वे स्थानकदेखील उभारले असल्याने बालचमुंसह पालकवर्गासाठी छानसे विरंगुळ्याचे साधन कळव्यात उपलब्ध झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुट्टीच्या काळात सदरची ट्रायट्रेन ठाणेकरांसाठी आकर्षणचा केंद्र बिंदू ठरत आहे.
ठाणे महापालिकेच्या कळवा प्रभाग समिती क्षेत्राच्या बगीच्यालगत २० लाख रुपयांच्या खर्चातून हा टॉयट्रेन प्रकल्प उभारण्यात आलाय. कळवा खाडीकिनारी ब्रिटीशकालीन पुलानजीक असलेल्या नक्षत्रवनालगतच्या पडीक भूखंडावर पूर्वी कचराकुंडी होती. बच्चेकंपनीला विविध वन्यप्राण्यांची माहिती व्हावी, यासाठी मनमोहक विद्युत रोषणाईसह रंगीबेरंगी कारंज्या आणि पुणे येथून आणलेल्या जिराफ, हत्ती, मोर, हरणे आदी प्राण्यांच्या प्रतिकृती या ठिकाणी उभारल्या आहेत. त्यामुळे टॉयट्रेनची सफर करताना जंगल सफर केल्याची अनुभूती घेता येते.

या टॉयट्रेनच्या इंजिनाला एकूण चार डबे जोडलेले असून पालिका आयुक्तांच्या दिवंगत मातोश्री शकुंतलादेवी यांच्या स्मरणार्थ येथे छोटेखानी शकुंतलादेवी रेल्वे स्थानकदेखील उभारण्यात आले आहे. गोलाकार वर्तुळात लघु लोहमार्गावरून दिमाखात फिरणाऱ्या या झुकझुक गाडीत बसून चार फेऱ्या पूर्ण करण्यासाठी प्रत्येकी २० रुपये शुल्क आकारले जात आहे.  ठाण्यातील कळवा परिसरातील नागरिकांकडून या प्रकल्पाबद्दल आनंद व्यक्त होताना दिसतोय.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Matherans feel in kalawa toyetrain thane
First published on: 26-04-2017 at 19:11 IST