ठाणे: घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी आणि माजिवडा भागात मेट्रोच्या खांबावर गर्डर बसविण्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) केले जाणार आहे. हे काम रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे रविवारी घोडबंदर मार्गावर कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

घोडबंदर मार्गावर वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या कामामुळे घोडबंदर भागातील मुख्य रस्ते, सेवा रस्त्यांवर ठिकठिकाणी मार्गावरोधक उभारण्यात आले आहे. या मार्गावरोधकामुळे मुख्य मार्गिका अरुंद झाली असून त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर होतो.

मेट्रो कामाचा भाग असलेल्या कापूरबावडी मेट्रो स्थानकाच्या निर्माणाचे काम कापूरबावडी उड्डाणपूलालगत सुरु आहे. या कामासाठी मेट्रोच्या खांबावर गर्डर उभारले जाणार आहे. हे काम शनिवारी रात्री ११ ते रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. या कामादरम्यान कापूरबावडी जंक्शन, तत्त्वज्ञान विद्यापीठ परिसरातील वाहतुक उलट दिशेने तर काही ठिकाणी सेवा रस्त्यावरून सुरु राहणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वाहतूक बदलामुळे वाहनांचा भार वाढून परिसरात कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ठाणे वाहतुक पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.