scorecardresearch

ठाणे : काँग्रेस, राष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष आहेत का ? असदुद्दीन ओवेसी यांचा सवाल

एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असुदुद्दीन ओवेसी यांनी मुंब्रा शहरात शनिवारी जाहीर सभा घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर टीका केली. 

Asaduddin Owaisi Reaction Congress
काँग्रेसबाबत नेमकं काय म्हटलं आहे ओवैसी? एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असुदुद्दीन ओवेसी फोटो- लोकसत्ता

पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्या भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नेते पुण्यातील पोटनिवडणूकित धर्मनिरपेक्षच्या नावावर मत मागत आहेत. परंतु हे दोन्ही पक्ष मुस्लिम आरक्षणाबद्दल काहीच बोलत नसल्यामुळे ते धर्मनिरपेक्ष कसे असा प्रश्न एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी शनिवारी मुंब्र्यातील जाहीर सभेत बोलताना उपस्थित केला आहे. तर औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर झाले असले तरी मी औरंगाबादचाचं खासदार असल्याचे खासदार इमियाज जलील यांनी सभेत बोलताना सांगितले.

हेही वाचा >>> “सर्वोच्च शक्तीमान माणूस कोण?”, जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपामुळे नव्या चर्चेला सुरुवात

एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असुदुद्दीन ओवेसी यांनी मुंब्रा शहरात शनिवारी जाहीर सभा घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर टीका केली.  या सभेत एमआयएमचे देशभरातील पदाधिकारी उपस्थित होते. उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, शरद पवार हे नेता बनू शकतात तर महाराष्ट्रातील मुस्लिम तरूण नेता का बनू शकत नाही, असा प्रश्नही ओवेसी यांनी उपस्थित केला आहे. मुंब्रामध्ये एमआयएमला बळ मिळत आहे. मी भाजपाची ‘ बी टीम’ असल्याचा आरोप होतो. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष पराभूत होतात, तेव्हाच आमच्यावर असे आरोप होतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. 

हेही वाचा >>> उल्हासनगरात ठाकरे गटाला गळती सुरूच, विद्यमान शहरप्रमुखाचा माजी नगरसेवकासह शिवसेनेत प्रवेश

शिवसेनेत दोन गट पडले असून तुम्हाला उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती नाही का? असा प्रश्न पत्रकारांकडून विचारला जात आहे. परंतु जेव्हा मुंबई दंगलीत कत्तल होत होती, ताडा कायद्याअंतर्गत कारवाई केली जात होती, तेव्हा सहानभूती कुठे होती, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे ही राम आणि श्यामची जोडी आहे. कधीही एकत्र येतील. असेही ते म्हणाले.

घड्याळ’ बंद पडणार

मुंब्रा शहरात ‘घड्याळ’ आता बंद पडणार असून हवेत ‘पतंग’ उडवली जाणार असल्याची टिका वारिस पठाण यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-02-2023 at 23:31 IST

संबंधित बातम्या