सुहास बिऱ्हाडे, प्रतिनिधी

मीरारोड या ठिकाणी झालेल्या सरस्वती वैद्यच्या हत्याकांडामुळे अवघा देश हादरला आहे. मनोज सानेने त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्यची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तिने तुकडे केले. हे तुकडे कुकरमध्ये शिजवले, गॅसवर भाजले, मिक्सरमध्ये बारीक केले. शेजाऱ्यांना वास येऊ लागला, त्यांनी मनोज सानेला याबाबत विचारणा केली. पण त्याने टाळाटाळ केली. त्यानंतर पोलिसांना याविषयी कळवण्यात आलं. पोलिसांनी जेव्हा घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना सगळं दृश्य पाहून धक्काच बसला. मृतदेहाचे असंख्या तुकडे घरात होते. पातेली, बादल्या यामध्ये हे तुकडे होते. या प्रकरणी मनोजला अटक करण्यात आली आहे. मनोज साने डेटिंग अॅपवर सक्रिय होता असं आता पोलीस तपासात समोर आलं आहे. तसंच सरस्वतीचा मोबाईलही तोच वापरत होता असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

मनोज साने डेटिंग ॲपवर सक्रिय

साने याने सरस्वती बरोबर काही वर्षांपूर्वी वसईच्या तुंगारेश्वर येथील मंदिरात जाऊन लग्न केले होते. दोघांमध्ये मतभेद होते. मनोज साने डेटिंग ॲपवर सक्रिय होता. त्याच्या मोबाईल फोनच्या तपशीलाच्या आधारे ( सीडीआर) त्याच्या संपर्कात असणाऱ्यांकडे पोलीस याबाबत चौकशी करत आहेत. एवढंच नाही तर सरस्वतीचा मोबाईल फोन देखील मनोज साने वापरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वी सरस्वतीच्या बहिणीने आत्महत्या केली होती अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.

सरस्वती वैद्यच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार

सरस्वती वैद्यच्या मृतदेहावर सोमवारी संध्याकाळी रे रोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या बहिणींची ओळख पटल्यानंतर सरस्वतीचा मृतदेह पोलिसांनी त्यांच्या ताब्यात दिला होता. मीरा रोड येथील मनोज सानेच्या घरात सरस्वती वैद्यच्या मृतदेहाचे तुकडे ७ जून रोजी पोलिसांना सापडले होते. ही घटना समोर येताच तिच्या तीन बहिणींना संपर्क करण्यात आला होता. जेजे रुग्णालयात सरस्वतीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आणि शरीराचे तुकडे जुळविण्यात आले होते. सोमवारी संध्याकाळी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन बहिणींच्या ताब्यात दिला होता. जेजे रुग्णालयातून मृतदेह मिळाल्यानंतर लगेचच रे रोड येथील स्मशानभूमीत तिच्या बहिणी, मोजके नातेवाईक आणि पंचांच्या उपस्थितीत तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी गोळा केले १३ पुरावे

सरस्वतीचा कथित पती मनोज साने याने तिची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे कारवतीने तुकडे करून ते कुकर मध्ये शिजवून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता.मनोज साने याने फेकलेल्या मृतदेहाच्या अवशेषांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सोमवारी सानेच्या घरात तसेच घराशेजारील नाल्यात शोध घेतला. मनोज सानेच्या घरातून पोलिसांनी १३ विविध प्रकारचे पुरावे गोळा केले आहेत. त्यात कुकर, करवत, बादल्या, पातेले आदींचा समावेश आहे. हत्येपूर्वी सरस्वतीवर विषप्रयोग झाल्याची शक्यता असून त्या दृष्टीने देखील पोलीस तपास करत आहेत. मनोज साने गुगलवर यासंदर्भातील माहिती देखील मिळवत होता, असे पोलिसांनी सांगितले.