विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता

Mira Road Murder: मनोज सानेने सरस्वती वैद्यची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण राज्य आणि देश हादरला. मनोज सानेला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरु आहे. मनोज सानेने नेमकी हत्या कशी केली याचा तांत्रिक शोध घेण्यासाठी आता परराज्यातील तज्ज्ञांचीही मदत घेतली जाणार आहे. दरम्यान, साने विकृतीचे आणखी कारनामे समोर आले आहेत. सरस्वती वैद्यची हत्या केल्यानंतर मनोजने तिचा मृतदेह विवस्त्र करून ‘न्यूड सेल्फी’ काढले होते अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

मनोज सानेनेच दिली न्यूड सेल्फींची कबुली

मीरारोड मध्ये राहणार्‍या मनोज साने याने त्याची कथित पत्नी सरस्वती वैद्यची हत्या केल्यानंतर तपासात त्याच्या विकृतीच्या अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. सरस्वतीची हत्या केल्यानंतर मनोज सानेने तिच्या विवस्त्र मृतदेहाबरोबर छायाचित्रे (न्यूड सेल्फी) काढले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मनोज सानेने अत्यंत थंड डोक्याने कट आखून सरस्वतीची केलेली हत्या केली. एवढंच नाही तर पोलिसांनी पकडल्यावर काय उत्तरं द्यायची याची सर्व तयारी त्याने केली होती.

हे पण वाचाः Mira Road Murder : सरस्वतीच्या मृतदेहाचे आणि डोक्यावरच्या लांबसडक केसांचे फोटो पाहून बहिणीने फोडला टाहो, म्हणाली…

मनोज सानेने ज्या प्रकारे सरस्वतीची हत्या केली होती ते पाहता त्याने भूतकाळातही असा काही गुन्हा केला होता का त्याचाही तपास पोलीस करत आहेत. पालघर जिल्ह्यातील मनोर येथे अशाच प्रकारे एका महिलेचा मृतदेह तुकडे केलेल्या अवस्थेत मिळाला होता. त्यामुळे पोलीस त्या घटनेचा आणि मनोज सानेचा काही संबंध आहे का ते तपासत आहेत.

परराज्यातील तज्ज्ञांची मदत घेणार पोलीस

सरस्वतीने आत्महत्या केल्याचा मनोज साने याचा दावा खोटा असल्याचे पोलिसांनी सांगितले. मनोज साने यानेच तिची हत्या केली आहे. मात्र ती नेमकी कशी केली याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे. त्यासाठी विशिष्ट चाचण्या करून पुरावे गोळा करायचे आहेत. मात्र ती सोय महाराष्ट्रात कुठेही नसल्याने पोलिसांनी आता परराज्यातून तज्ज्ञांचे पथक बोलवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

हे पण वाचा: Mira Road Murder : ‘मनोज साने आणि सरस्वतीने लग्न का लपवलं होतं?’ पोलिसांनी दिलं उत्तर, म्हणाले…

लिव्ह इन नव्हे, तर सरस्वतीची फसवणूकच

२०१४ मध्ये सरस्वती नोकरीच्या निमित्ताने सानेला भेटली होती. त्यावेळी तिला आसरा देण्याच्या बहाण्याने तिला घरात ठेवले. मात्र मनोजने तिची फसवणूक केली. नाईलाजाने तिला मनोजशी वज्रेश्वरी येथील मंदिरात लग्न करावे लागले. ही बाब जेव्हा सरस्वतीच्या बहिणींना समजली तेव्हा त्यांनी या संबंधांना विरोध केला होता. मात्र अनाथ सरस्वतीकडे शिक्षण, नोकरी किंवा आधार देणारे कुणी नसल्याने तिला नाईलाजाने मनोज सानेसह रहावे लागले होते. सरस्वतीला घरातून बाहेर पडण्यास बंदी होती. ती अहमनगर येथील आश्रमात जेव्हा जायची तेव्हा साने मामा असल्याचे सांगत होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

होय मी विकृत.. सानेची पोलिसांना कबुली

मनोज सानेकडून गुन्ह्याची कबुली घेण्यासाठी पोलीस त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत आहेत. परंतु साने त्यांना साने सराईतपणे उत्तरं देतो आहे. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे असंख्य तुकडे का केले असे विचारला असता, “मी विकृत आहे, असं तुम्ही समजा” असे सानेने सांगितल्याची माहितीही पोलिसांनी दिली.