लोकसत्ता टीम

ठाणे : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे वादग्रस्त भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासाठी जाहीरपणे प्रचारात उतरल्याचे मंगळवारी दिसून आले. श्रीकांत शिंदे यांचे समर्थक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार प्रकरणी तुरुंगात असलेले आमदार गायकवाड यांनी भाजपचे कार्यकर्ते श्रीकांत यांना साथ देतील अशी भूमिका मध्यंतरी घेतली होती. भाजपाचे डोंबिवलीतील मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या कामी मध्यस्ताची भूमिका बजावली होती. असे असताना प्रत्यक्ष प्रचारात मात्र सुलभा गायकवाड या वैशाली दरेकर यांच्यासमवेत दिसून आल्याने कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपा आणि शिवसेनेमधील दुही पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.

Congress, Bhushan Patil, campaign,
काँग्रेसचे भूषण पाटील यांच्या दिमतीला आघाडीच्या सर्वपक्षीय नेत्यांची फौज
Ganesh Naik, Shinde sena, thane,
गणेश नाईक-शिंदेसेनेच्या मनोमिलन मेळाव्याला मुहूर्त मिळेना
Ganesh Naik, Shinde sena, thane,
गणेश नाईक-शिंदेसेनेच्या मनोमिलन मेळाव्याला मुहूर्त मिळेना
Devendra Fadnavis
“सदाभाऊ यावेळी संधी पक्की, पण पुढच्या वेळी…”; देवेंद्र फडणवीसांचं शिंदे गटाच्या नेत्याबाबत मोठं विधान
congress leader prithviraj chavan attacked modi government in public meeting in sangvi
नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचंड मोठी लाट – पृथ्वीराज चव्हाण; सांगवीतील जाहीर सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मोदी सरकारवर प्रहार
Udayanraje Bhosale Full Speech
उदयनराजे भोसले यांची शशिकांत शिंदेंवर खोचक टीका; म्हणाले, “कपाटं आणि खिशाला…”
Naresh Mhaske, Mira Bhayander,
कोण नरेश म्हस्के? मिरा भाईंदरच्या कार्यकर्त्यांचा सवाल, भाजप पाठोपाठ शिवसेनाही नाराज
uddhav devendra Fadnavis
“मी नागपुरी आहे, त्यामुळे मला त्यांच्यापेक्षा…”, देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर

कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार गणपत गायकवाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यातले वितृष्ठ जगजाहीर आहे. खासदार शिंदे यांचे कट्टर समर्थक महेश गायकवाड यांनी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. महेश गायकवाड यांना खासदार शिंदे यांचे पाठबळ मिळत असल्याने आमदार गणपत गायकवाड गेल्या काही काळापासून अस्वस्थ होते. हि अस्वस्थता इतकी टोकाला पोहोचली आमदार गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात गंभीर जखमी झालेले महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील जुपिटर रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर बरे होऊन महेश गायकवाड सध्या कल्याणात आपल्या घरी परतले आहेत. महेश गायकवाड घरी परतत असताना त्यांच्या समर्थकांकडून जल्लोष त्यांचे स्वागत करण्यात आलं.

आणखी वाचा-मंगळवार ठरला उष्णवार! ठाणे जिल्ह्यात सरासरी तापमान ४२ अंश सेल्सियसवर

दरम्यान आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्य समर्थकांमधील टोकाचा वाद अजूनही कायम आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर या गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भेटल्या होत्या. या दोघींच्या भेटीमुळे त्यावेळी शिंदे गटात नाराजी व्यक्त केली जात होती. असे असले तरी आमदार गणपत गायकवाड हे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासोबत असतील अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रकारांना दिली होती. आमदार गायकवाड यांनीही तशी भूमिका जाहीर केल्याचे चव्हाण म्हणाले होते. प्रत्यक्षात मात्र कल्याण पूर्वेत वेगळ चित्र दिसू लागले असून आमदार गायकवाड यांच्या पत्नी सुलभा सोमवारपासून वैशाली दरेकर यांच्या प्रचारात दिसू लागल्याने शिवसेना भाजपा युतीत या भागात उभी फूट पडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.