scorecardresearch

Premium

मुंब्र्यात दोन महिन्यात आठ मजली बेकायदा इमारतींची उभारणी; आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

या भागातील ५० तरुण एकत्र येऊन तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याबाबत त्यांनी पालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

MLA Jitendra Awad alleged eight floor illegal buildings constructed Mumbra two months
मुंब्र्यात दोन महिन्यात आठ मजली बेकायदा इमारतींची उभारणी; आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप (संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे: महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येत असतानाच, मुंब्र्यात दोन महिन्यात आठ मजली बेकायदा इमारतींची उभारणी केली जात असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या भागातील ५० तरुण एकत्र येऊन तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याबाबत त्यांनी पालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. उद्या मुंब्रा परिसरातील तरुण मुलांनी सगळीकडून बंड केले तर मात्र परिस्थिती अवघड होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

rohit pawar
कारखान्यावरील कारवाईवर रोहित पवारांची खळबळजनक पोस्ट; म्हणाले, “एका नेत्याबद्दल अंदाज योग्य होता, पण…”
Eknath Nimgade murder case
नागपूर : एकनाथ निमगडे हत्याकांडाचा अहवाल सीबीआय न्यायालयात करणार सादर
pune district office
मर्जीतील अधिकाऱ्यांवरून दोन ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये जुंपली; पुणे जिल्हा प्रशासनामध्ये अस्वस्थता
Sanjay Raut
“कुठे गेल्या गायी-म्हशी? गोमांसभक्षक संघ कार्यकर्त्यांकडे…”, संजय राऊतांचं सरकारवर टीकास्र

मुंब्रा परिसरातील शमशाद नगर उभारण्यात येत असलेल्या बेकायदा बांधकामांबाबत माहितीचा एक संदेश आमदार आव्हाड यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केला आहे. मुंब्रा येथील शमशाद नगर मधील तरुण मुलांनी माझी भेट घेतली. शमशाद नगरच्या आजूबाजूला उभ्या राहत असलेल्या अनधिकृत इमारतींबद्दल त्यांनी तक्रार केली. दोन-दोन महिन्यात आठ-आठ मजल्याच्या इमारती उभ्या केल्या जात आहेत. यामुळे शमशादनगर येथील जुन्या गृहनिर्माण संकुलांना धोका निर्माण होऊ शकतो, असे आव्हाड यांनी संदेशात म्हटले आहे. त्या तरुणांचे म्हणणे होते की आम्ही अनेकवेळा तक्रारी केल्या पण, कोणीही याबाबत दखल घेतली नाही. म्हणून ते माझी भेट घ्यायला आले होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा… महामार्गावर अपघातामुळे कोंडी

ही तरुण मुले आता तयार झाली आहेत. अनधिकृत बांधकामांविरोधात ती आता आवाज उचलत आहेत. मुंब्रा परिसरातील एका गृहनिर्माण संकुलातील ५० मुले एकत्र येतात ही विचार करण्यासारखी बाब आहे. उघडपणाने ही तक्रार करणाऱ्या या मुलांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडू नये यासाठी तरी निदान आपण कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत आणि स्वतः त्यामध्ये लक्ष द्यावे एवढीच अपेक्षा, अशी मागणी त्यांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. उद्या मुंब्रा परिसरातील तरुण मुलांनी सगळीकडून बंड केलं तर मात्र परिस्थिती अवघड होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mla jitendra awhad has alleged that eight floor illegal buildings are being constructed in mumbra in two months dvr

First published on: 03-10-2023 at 11:26 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×