scorecardresearch

Premium

मनसेप्रमुख राज ठाकरेंचा उद्या ठाणे दौरा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे उद्या, गुरूवारी ठाणे शहराच्या दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यादरम्यान ते शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.

raj Thackeray
मनसेप्रमुख राज ठाकरेंचा उद्या ठाणे दौरा ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे उद्या, गुरूवारी ठाणे शहराच्या दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यादरम्यान ते शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. आगामी कोकण पदवीधर निवडणुकीबाबत ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सुत्रांकडून समजते.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी सर्वच पक्षांचे नेते शहरात दौरे करून पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत. याशिवाय, सर्वच राजकीय पक्षांनी कोकण पदवीधर निवडणुक लढविण्याची तयारी सुरू केली असून त्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून मतदार नोंदणी करण्यात येत आहे. मनसेकडूनही अशाप्रकारची तयारी सुरू आहे. असे असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे गुरूवारी सकाळी ९ वाजता ठाणे शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. नौपाडा येथील मध्यवर्ती कार्यालयात ते शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. यामध्ये आगामी कोकण पदवीधर निवडणुकीबाबत ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सुत्रांकडून समजते.

traffic congestion will affect industries in metros in future says union minister rajeev chandrasekhar
पुण्यासह इतर महानगरांसाठी धोक्याची घंटा! केंद्रीय राज्यमंत्री चंद्रशेखर यांचा इशारा
Vasai Bhayander Roro Boat Hits Jetty Passengers Stranded As Boat Gets Stranded
वसई भाईंदर रोरो बोट जेट्टीला धडकली, बोट अडकून पडल्याने प्रवाशांचा खोळंबा
Director General of Police Rashmi Shukla warns Naxalites in Gadchiroli
‘‘नागरिकांच्या सहकार्यानेच नक्षलवाद संपवू,” नक्षल्यांच्या गडातून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा इशारा…
nagpur crime news, nandanvan area crime news,
गृहमंत्र्यांच्या शहरात आणखी दोन हत्याकांड… उपराजधानातील कायदा व सुव्यवस्था वाऱ्यावर

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns chief raj thackeray will visit thane tomorrow thane amy

First published on: 15-11-2023 at 18:45 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×