ठाकुर्लीतील एका व्यापाऱ्याचा मोबाईल दुकानाच्या मंचकावरुन चोरुन पसार होणाऱ्या चोरट्याला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. चोरटा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे.विवेककुमार श्यामबिहारी श्रीवास्तव (२२) असे चोऱट्याचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील मंजरपूर तालुक्यातील फिरस्ता गावचा रहिवासी आहे.ठाकुर्ली चोळेगावातील रहिवासी पदमाकर पांडुरंग चौधरी (४८) यांचे चोळेगावात बिअर शाॅपीचे दुकान आहे. शनिवारी रात्री अकरा वाजता त्यांच्या दुकानात एक जण बिअर खरेदीसाठी आला. त्याने पदमाकर यांच्याकडे बिअरची मागणी केली. पदमाकर दुकानाच्या आतील भागात बिअर बाटली आणण्यासाठी गेले. त्यावेळी चोरट्याने त्यांचा दुकानाच्या मंचकावर ठेवलेला ७० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरुन तेथून पसार झाला.

हेही वाचा >>>ठाण्यात वर्षभरात ८५७१ थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडीत; यंदा पाणी देयंकाच्या वसुलीत १४ कोटी रुपयांनी वाढ

पदमाकर ग्राहकाला बिअर बाटली देण्यासाठी समोर आले तर ग्राहक तेथे नव्हता. त्यांना त्यांचा मोबाईल गायब असल्याचे दिसले. चोरट्याने चोरी केली केल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी दुकान परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून दोन तासात आरोपीला अटक केली. त्याच्याकडून चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.त्याने आतापर्यंत चोरीचे किती गु्न्हे केले आहेत याची माहिती पोलीस घेत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.