योगगुरु रामदेव बाबा यांनी महिलांविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून राष्ट्रवादी पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी रामदेव बाबा यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर विनयभंगचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ठाण्याचे पोलीस हे आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करतात, त्यातच विनयभंगाचा गुन्हा दाखल करतात. आता बाबा रामदेव यांच्या वक्तामुळे तिथे असलेल्या अनेक माता भगिनींच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न झाली आहे. त्यामुळे रामदेव बाबा यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, असे त्यांनी म्हटले आहे.

 “महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि काही नाही घातले तरी चांगल्या दिसतात,” असे विधान बाबा रामदेव यांनी ठाण्यातील महिला संमेलन कार्यक्रमात बोलताना केले होते. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी रामदेव बाबा यांच्या वक्तव्याचा निषेध करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपण स्त्रीला आदिशक्ती व देवीच्या भूमिकेत मानतो. महाराजांपासून आपण स्त्रीला मोठा स्थान देत आलो आहोत.

हेही वाचा: कल्याण: दुर्बल विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी कल्याण ते दिल्ली सायकल स्वारी

आज जे रामदेव बाबांनी विधान केले, ते स्त्री जातीचा अपमान आहे. अमृता फडणवीस या समोर असताना अशा प्रकारचा विधान झालेला आहे. हे विधान बाबा रामदेव त्यांच्या विकृत मनोवृत्तीचा प्रदर्शन करणारे आहे. भगवे वस्त्र घातले आणि योगा केला, यामुळे मानसिक स्वास्थ सुधारू शकत. पण मानसिक दृष्ठ्या बाबा रामदेव विकृत आणि मनोरुग्ण आहेत, हे त्यांच्या विधानातून स्पष्ट झाले आहे, असे परांजपे यांनी म्हटले आहे.ठाण्याचे पोलीस हे आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करतात, त्यातच विनयभंगाचा गुन्हा दाखल करतात. आता बाबा रामदेव यांच्या वक्तामुळे तिथे असलेल्या अनेक माता भगिनींच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न झाली आहे. त्यामुळे रामदेव बाबा यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा. 354 ड या कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात यावा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखात असून त्यांनी कारवाई करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: ठाणेकरांनो सावधान!; बसमध्ये मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमच्यावर दुसरे खोटे गुन्हे दाखल करतात, तसे आता हिम्मत दाखवून खरे गुन्हे दाखल करावे. राष्ट्रवादी या विधानाचा विरोध करत आहेत. रामदेव बाबा यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करत आहे. राजापालांनी आधी विधान केले. त्यानंतर आता रामदेव बाबांनी अशा प्रकारे स्त्रीच्या अपमानास्पद विधान केले. महाराष्ट्राच्या अस्मिता वरती आघात करण्याचे वारंवार प्रकार सुरू आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.