भगवान मंडलिक

मागील वर्षभरात ठाणे जिल्ह्याच्या विविध जंगल भागात बिबट्यांनी संचार केला आहे. भक्ष्यासाठी बिबटे गाव, शहरी भागात आता शिरकाव करत आहेत. बिबट्यांचे ठाणे जिल्ह्याच्या जंगल पट्ट्यातील हे वाढते भ्रमण येत्या काळात जिल्ह्यात बिबट्याचा अधिवास वाढू शकते, अशी माहिती प्राणी संवर्धनासाठी काम करणाऱ्या ‘प्लान्ट ॲन्ड अनिमेल वेल्फेअर सोसायटी’चे (पाॅज) संचालक नीलेश भणगे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

nagpur ambazari lake marathi news, nagpur ambazari lake latest marathi news
अंबाझरीतील धोका कायमच! परिसरातील वस्त्यांच्या सुरक्षेबाबत नुसतीच चालढकल
Video of Nayantara tigress and Deadly Boys tiger in Navegaon Nimdhela safari area goes viral
Video : …आणि ताडोबात दोन वाघांचे झालेत चार वाघ
onion, Dindori, loksabha election 2024,
दिंडोरीत कांदा प्रचाराच्या केंद्रस्थानी
gadchiroli lok sabha marathi news, gadchiroli lok sabha election marathi news
७ हेलिकॉप्टर, १५ हजारांहून अधिक जवान, गडचिरोलीत युद्ध क्षेत्राचा भास व्हावा…..

हेही वाचा >>>ठाणे: कशेळी खाडी पूलावरील मातीचे ढिगारे उचलेले; रस्त्यावरील धूळप्रदूषण मात्र कायम

जिल्ह्यातील वनाधिकाऱ्यांनी मात्र घाईने असा निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. मात्र, यापूर्वीच्या प्रमाणात बिबट्याचा ठाणे जिल्ह्यातील संचार वाढला आहे हे वनाधिकाऱ्यांनी मान्य केले. जिल्ह्याच्या जंगल भागातील भक्षक वन्यजीव, पाण्याची उपलब्धता पाहता येत्या काळात ते जिल्ह्याच्या जंगलपट्टी भागात अधिवास करू शकतात, अशी पुष्टी वनाधिकाऱ्यांनी जोडली. ठाणे जिल्ह्यात तानसा अभयारण्य आहे. माळशेज घाट भीमाशंकरचा जंगल पट्टा, मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, घोडबंदर, नागला बंदराचा विचार करता पुरक अशी परिस्थिती बिबट्यांच्या या भागातील अधिवासासाठी पुरेशी आहे, असे अधिकारी म्हणाला.

हेही वाचा >>>ठाणे: अपघातात तरुणाचा मृत्यू

‘पाॅज’ संस्थेचे संचालक नीलेश भणगे यांनी सांगितले, ठाणे जिल्ह्यात माळशेज घाट, बारवी धरण जंगल भाग, भीमाशंकर जंगल पट्टा, तानसा अभयारण्य, भातसा धरण खोरे, कसारा ते घाटघर सह्याद्री पर्वताची रांग, जव्हार, मोखाडा भागात विखुरलेले पण घनदाट जंगल आहे. या जंगलांमध्ये विविध प्रकारचे वन्यजीव आहेत. जंगल खोऱ्यांमध्ये बारवी, तानसा, भातसा, वैतरणा धरणांचे पाणलोट आहेत. हरणे, तरस, भेकर, नीळगाय अशा अनेक प्रकारचा वन्यजीव या भागात मुक्त संचार करतो. राज्याच्या विविध जंगल भागात शेतघरे, नवीन गृहसंकुले आकारास येऊ लागली. दळणवळणासाठी प्रशस्त रस्ते जंगलांमधून काढण्यात येत आहेत. या कामांच्या ठिकाणी यंत्रांची धडधड, दगड फोडण्यासाठी सुरूंग स्फोट आणि जंगल भागातील वाढलेला मानवी संचार यामुळे ठराविक भागात अधिवास करुन असलेले बिबटे आता आपला मूळ अधिवास सोडून सुरक्षित स्थळांचा शोध घेत बाहेर पडत आहेत. मूळ अधिवासातून बाहेर पडलेला बिबट्या अनाहूत जंगल, भागातून जाताना भक्ष्याचा शोध घेत शहरी पट्ट्यात शिरकाव करत आहे. मागील वर्षभरात बदलापूर, उल्हासनगर, मुरबाड आणि आता कल्याण मध्ये बिबट्याने प्रवेश केला आहे. काही दिवसापूर्वी बिबट्या शहापूर तालुक्यातील (जि.ठाणे) साकडबाव, कोठारे कसारा, भातसा खोरे जंगला लगतच्या भागात आढळला होता. त्यानंतर कसारा भागात एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला होता. भिवंडी जवळील चिंचपाडा पडघा जंगल पट्ट्यात काही महिन्यापूर्वी बिबट्याचा संचार होता. कर्जत, नेरळ भागात बिबट्या आढळून आला होता. बिबट भक्ष्या बरोबर मादीच्या शोधासाठी भ्रमंती करतात. या भ्रमंतीत प्रजनन आणि अधिवास क्षेत्र ते निश्चित करतात, असे भणगे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>कल्याण, डोंबिवलीतील गुंतवणूकदारांची सेरेनिटी स्वास्थम कंपनीकडून कोट्यवधीची फसवणूक

चलतमार्गात बांधकामे
बिबट्या, वाघांचा जंगलांमधील चलत मार्ग (काॅरिडाॅर) ठरलेले असतात. ते यापूर्वी जंगलपट्टीतून त्यांच्या चलतमार्गिकेतून भ्रमण करत होते. या चलतमार्गिका आता नागरीकरण, बांधकामे, रस्ते मार्गांमुळे बाधित होत आहेत. माणसाने बांधकामांच्या माध्यमातून जंगलांवर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे बिबट्या आपणास आपल्या घराजवळ आल्याचे जाणवते. प्रत्यक्षात आपण त्याच्या अधिवास क्षेत्रात घुसखोरी केली आहे, असे भणगे म्हणाले. अधिवासाला धोका झाल्याची जाणीव झाल्याने बिबटे आपला मूळ अधिवास सोडून नवख्या जंगलपट्टीत संचार करताना दिसत आहेत. या नवख्या जंगलात नर, मादी यांची भ्रमंती असेल तर तेच त्यांचे अधिवास क्षेत्र बनवितात. ठाणे जिल्ह्यातील बिबट्यांची गेल्या दोन वर्षातील भ्रमंती पाहता हळूहळू ते जिल्ह्याच्या जंगलपट्टीत अधिवास क्षेत्र बनवतील अशी शक्यता आहे, असे ‘पाॅज’चे नीलेश भणगे यांनी सांगितले.

“ ठाणे जिल्ह्यातील बिबट्यांचा वाढता संचार आणि नैसर्गिक परिस्थिती पाहता ते येत्या काळात जिल्ह्यात आपले अधिवास क्षेत्र बनवू शकतात.”- नीलेश भणगे,संचालक, ‘पाॅज’ संस्था