ठाणे : महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता कमी दिसत असून हिच आपल्याला पक्षवाढीसाठी संधी आहे. त्यामुळे लोकापर्यंत जाऊन पक्षवाढीसाठी काम करा, असा कानमंत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना शनिवारी बैठकीत दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथील टेंभीनाका भागातील जैन मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी सकाळी उपस्थिती लावली. या कार्यक्रमानंतर त्यांनी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह शहराचे पदाधिकारी, विभागध्यक्ष आणि शाखाध्यक्ष उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी सर्वच पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सुचना दिल्या.

हेही वाचा >>> VIDEO : ‘मंजिल एक दिन आयेगी…’ नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसात नरेश म्हस्केंची शायरी; म्हणाले “आमदारकीसाठी…”

पक्षवाढीसाठी काय करायला हवे आणि त्यासाठी पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी कसे काम करायला हवे. या पदाधिकाऱ्यांनी त्यांची जबाबदारी कशी पार पडावी, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता कमी दिसत आहे. निवडणुका आता जाहीर होणार नाहीत, हिच आपल्याला पक्षवाढीसाठी संधी आहे. त्यामुळे लोकापर्यंत जाऊन पक्षवाढीसाठी काम करा, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. लोकापर्यंत जाऊन काम केले तर येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला नक्कीच यश मिळेल आणि त्यासाठी सर्वच पदाधिकाऱ्यांनी कामाला लागण्याचा सल्लाही त्यांनी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal elections background work for people raj thackeray instructions ysh
First published on: 21-01-2023 at 14:58 IST