उल्हासनगर: कार्यालयीन वेळ चुकवत कायमच उशिराने कार्यालयात येणाऱ्या उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांचा आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. स्वयंचलित हजेरी पद्धत असतानाही हे कामगार उशिराने येत असल्याने त्याचा कामकाजावर परिणाम होत होता. त्यात विभाग प्रमुखही कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.

हेही वाचा >>> डोंबिवलीत भोपर रस्ता कमानीच्या कामासाठी २५ दिवसांपासून बंद ; नोकरदार, विद्यार्थी, नागरिकांचे हाल

हेही वाचा >>> डोंबिवली : लोढा हेरिटेजमध्ये पेट्रोल चोरी करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला रहिवाशांनी पकडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उल्हासनगर महापालिकेत कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित आहेत. अनेक अधिकारी आणि कर्मचारी कमी असल्याने पालिकेच्या कारभारावर त्याचा परिणाम होतो आहे. त्यामुळे अनेक पदांवर प्रभारी पध्दतीने कनिष्ठ कर्मचारी नेमले आहेत. मात्र याच कर्मचाऱ्यांकडून पालिकेच्याच नियमांना हरताळ फासला जात असल्याचे समोर आले आहे. उल्हासनगर महापालिकेचे अनेक कर्मचारी ठरलेल्या वेळेपेक्षा उशिराने मुख्यालयात पोहोचत असल्याचे दिसून आले आहे. याबाबत अनेक कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही कर्मचारी ठरलेल्या वेळेपेक्षा उशिराने येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सोमवारी या कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाने धक्का दिला. सकाळी दहा नंतर पालिकेतील वरिष्ठ अधिकारी यांनी प्रवेशद्वार गाठत उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुष्प दिले. यावेळी कर्मचाऱ्यांना वेळेचे भान राखण्याचे आवाहन करण्यात आले. विशेष म्हणजे पालिका मुख्यालयात स्वयंचलित बायोमेट्रिक हजेरी पद्धत कार्यरत आहे. त्यानंतरही कर्मचारी उशिराने येत असल्याने पालिकेच्या नियमांचा या कर्मचाऱ्यांना धाक आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.