मीरा रोड एका भयानक हत्याकांडाने हादरलं आहे. मनोज साने नावाच्या एका माणसाने त्याच्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दहा वर्षांपासून मनोज आणि सरस्वती हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. ५६ वर्षीय मनोज साने याने पार्टनरच्या मृतदेहाचे तुकडे करून ते कुकरमध्ये शिजवले, गॅसवर भाजले आणि नंतर बादलीत लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. साने यांच्या शेजाऱ्याने सांगितलं ते ऐकून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

साने यांच्या शेजाऱ्याने काय सांगितलं?

साने यांच्या शेजाराऱ्याने ANI ला सांगितलं की, मनोज साने यांच्या घरातून दुर्गंधी येत होती. मनोज साने हे कुणामध्ये मिसळत नव्हते. मी तीन वर्षे त्यांच्या शेजारी राहतो आहे पण त्यांचं नाव काय ते पण मला माहित नव्हतं. कुठल्याही सणासुदीलाही ते बाहेर पडायचे नाहीत. सोमवारी मला त्यांच्या घरातून वास येऊ लागला. मला वाटलं की उंदीर मेल्यामुळे वास येतील. आपल्या घराच्या शेजारी अशी काही हत्या वगैरे झाली असेल हे तर आम्हाला कधी वाटलंही नव्हतं. आम्ही असं हत्याकांड, खुनाचे प्रकार हे सगळे टीव्ही सीरीयल्समध्ये पाहिले आहेत. सुरुवातीला वाटलं की उंदीर मेला असेल. मला वास आल्यानंतर मी साने यांना सांगितलं. त्यांच्या घराला अर्धावेळ तर कुलुप असायचं. मंगळवारी मी आल्यानंतर वास खूप मोठ्या प्रमाणावर आला. मी त्यांना बोलवायला गेलो. दार वाजवलं. पण काहीही प्रतिसाद आला नाही. मग मी थोडावेळ थांबलो तर मला रुम फ्रेशनरचा वास आला.

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
happiness hashtag, balmaifal happiness
सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!
nia denies allegations of unlawful actions in bengal s bhupatinagar
छाप्यांमागे दुष्ट हेतू नाही! आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीनंतर ‘एनआयए’चा खुलासा
sharmila tagore property
“मी खरेदी केलेली संपत्ती माझ्याच नावावर”, शर्मिला टागोर यांची माहिती; म्हणाल्या, “इस्लाममध्ये मृत्यूपत्र करण्याची…”

रूम फ्रेशनरचा वास आल्यावर मला थोडा संशय आला. पण त्यांनी दरवाजा उघडला नाही. मग मी वास असह्य होऊ लागल्याने जरावेळ खाली गेलो. तर १० मिनिटातच मनोज साने बॅग घेऊन खाली आले. मी त्यांना सांगितलं तुमच्या घरातून दुर्गंध येतो आहे. उंदीर वगैरे मेला आहे की आपण पाहू. तर ते म्हणाले मला तातडीने बाहेर जायचं आहे. मी त्यांना म्हटलं अहो पाच मिनिटं चला एकदा आपण पाहू काय झालंय का? पण त्यांनी काही ऐकलं नाही. ते घाईने निघून गेले. मी परत येतो तेव्हा पाहू म्हणाले. मग मी इमारतीच्या सेक्रेटरीला याविषयी सांगितलं. स्प्रे मारल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला नाही. पण जेव्हा मनोज साने खाली उतरले तेव्हा त्यांच्या अंगालाही दुर्गंधी येत होती आणि घाबरले होते. मला संशय होताच त्यामुळे सेक्रेटरींना सांगितल्यानंतर त्यांनी त्या एजंटला बोलावलं ज्याने तो फ्लॅट सानेंना दिला होता. एजंट आला, त्याच्याकडे चावी होतीच. पण तेव्हा वास येत नव्हता कारण तेव्हा त्यांनी रुम फ्रेशनर मारला होता. असं मनोज साने यांच्या शेजाऱ्याने सांगितलं आहे.

डीसीपी जयंत बजबळे यांनी काय म्हटलं आहे?

एका इमारतीच्या सातव्या मजल्यावर दुर्गंधी येत असल्याची तक्रार स्थानिक पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. फ्लॅटचं कुलुप तोडून प्रवेश केला असता पोलिसांना घटनास्थळी मृतदेहाचे कापलेले तुकडे सापडले. त्याचबरोबर कटरही सापडलं आहे. त्याच अनुषंगाने तपास केला आणि मृत महिलेची ओळख पटवली. या प्रकरणातल्या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. मृतदेहाचे तुकडे आम्ही जे. जे. रुग्णालयात पाठवले आहेत. आमचा पुढील तपास सुरु आहे. मनोजच्या लिव्ह इन पार्टनरने म्हणजेच सरस्वतीने आत्महत्या केल्याचा दावा खोटा आहे. आम्हाला मनोजच्या घरात सरस्वतीच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे सापडले. सरस्वती आणि मनोज हे दहा वर्षांपासून एकत्र राहात होते. सरस्वती अनाथ होती तिला कुणीही नातेवाईक नाहीत. तिचं शिक्षण १० वीपर्यंत झालं होतं. ३ पातेली, दोन बादल्या आणि कुकर यामध्ये मृतदेहाचे तुकडे होते. ४ जूनपासून सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे कापत होता. या घटनेनंतरही आरोपी मनोज त्याच घरात राहात होता. किचनमध्ये तुकडे शिजवत होता आणि जेवायला बाहेर जात होता अशी माहिती डीसीपी जयंत बजबळेंनी दिली आहे.