नेपाळमधील पोखराहून जोमसोमकाडे जात असताना बेपत्ता झालेल्या विमानाचे अवशेष सापडले आहेत. या विमानातून प्रवास करणाऱ्या ठाण्यातील अशोक त्रिपाठी कुटुंबामधील चौघांचा अद्याप शोध लागलेला नाही. अशोक त्रिपाठी आणि त्यांची पत्नी वैभवी बांदेकर हे दोघे गेल्या काही वर्षांपासून विभक्त राहतात. न्यायालयाच्या आदेशानुसार त्रिपाठी दाम्पत्य वर्षातून एकदा एकत्र येऊन दोन्ही मुलांना दहा दिवस बाहेर फिरायला घेऊन जातात. अशाचप्रकारे ते यंदा नेपाळमध्ये फिरायला गेले होते. मात्र मध्येच हा विमान अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा >>> व्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू; रशियाच्या सत्तेवर त्यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती; ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा

अशोक कुमार त्रिपाठी (५४), त्यांची पत्नी वैभवी बांदेकर(५१), मुलगा धनुष त्रिपाठी(२२) आणि मुलगी रितिका त्रिपाठी(१५) हे चौघे बेपत्ता आहेत. अशोक त्रिपाठी आणि त्यांची पत्नी वैभवी हे दोघे गेल्या काही वर्षांपूपासून विभक्त राहतात. अशोक हे भुनेशवर येथे राहतात. तर वैभवी या ठाण्यातील माजीवडा भागातील रुस्तमजी इमारतीत राहतात. त्या मुंबईतील बिकेसी भागातील एका खासगी कंपनीत उच्च पदावर काम करीत आहेत. धनुष हा महाविद्यालयात शिकतो तर, त्याची बहीण रितिका ही शाळेत जाते. ही दोन्ही मुले वैभवी यांच्यासोबत राहतात.

हेही वाचा >>> जम्मू काश्मीर: पाकिस्तानमधून बॉम्ब घेऊन येणारं ड्रोन सुरक्षा दलानं पाडलं, सात मॅग्नेटीक बॉम्ब जप्त

रविवारी सकाळी त्रिपाठी कुटुंब नेपाळमधील पोखराहून जोमसोमला निघालेल्या तारा एअरच्या ९ एनएईटी ट्विन-इंजिन या विमानातून प्रवास करत होते. त्यांच्यासह एकूण २२ प्रवासी विमानात होते. या विमानाने उड्डाण घेतले आणि त्यानंतर काही वेळातच विमानाचा संपर्क तुटला. या बेपत्ता विमानाचा शोध सुरू असताना त्याचे अवशेष कोवांग गावात सापडले आहेत. याच विमानातून प्रवास करत असलेल्या त्रिपाठी कुटुंबातील चौघेजण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

हेही वाचा >>> प्रसिद्ध गायक सिद्धू मुसे वाला यांची गोळ्या झाडून हत्या, पंजाब सरकारने सुरक्षा काढून घेताच अज्ञातांकडून हल्ला

दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार त्रिपाठी दाम्पत्य वर्षातून एकदा एकत्र येऊन दोन्ही मुलांना दहा दिवस बाहेर फिरायला घेऊन जायचे. यावेळी ते नेपाळला फिरायला गेले होते. मात्र ते प्रवास करत असलेल्या विमानाचा अपघात झाला असून त्यांचा शोध अद्याप लागलेला नाही, अशी माहिती कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनवणे यांनी दिली.