कल्याण: डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिर स्मशानभूमीचे दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या ठेकेदार सुनीता प्रभाकर पाटील यांना कल्याण डोंबिवली पालिकेच्या मालमत्ता विभागाने २४ तासाच्या आत ठेका रद्द करण्याची नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. या स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून दहनासाठी पार्थिव घेऊन येणाऱ्या नागरिकांची अधिक प्रमाणात आर्थिक पिळवणूक केली जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या.

अनेक वर्षापासून या तक्रारी पालिकेत केल्या जात आहेत. शिवमंदिर स्मशानभूमीचा ठेका एका राजकीय वरदहस्त असलेल्या ठेकेदाराकडे असल्याने यापूर्वीच्या कोणत्याही आयुक्ताने स्मशानभूमीतील मनमानी कारभारा संदर्भात कधीच आक्रमक भूमिका घेतली नाही. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी प्रशासनाला कठोर शिस्त लावण्यास सुरूवात केल्याने शिवमंदिर स्मशानभूमीच्या तक्रारीची गंभीर दखल मालमत्ता विभागाने घेतली आहे. शिवमंदिर स्मशानभूमीत पार्थिव दहनासाठी आणल्यानंतर तेथील कर्मचारी विद्युत दाहिनी चालू असुन सुध्दा ती बंद आहे असे खोटे सांगून नागरिकांना लाकडे विकत घेण्यासाठी भाग पाडत होते. लाकडे दहनासाठी घेतल्यानंतर पालिकेने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारला जात होता. पार्थिवाला अग्नी देण्यासाठी येणाऱ्या भटजींच्या नावे दीड हजार रूपयांची वसुली कामगारच करत असल्याच्या तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्या होत्या. नागरिक या सगळ्या प्रकारामुळे अनेक वर्षापासून त्रस्त होते.

Black market, pune RTO, brokers,
पुणे आरटीओत ‘काळाबाजार’! दलालांनी उभारली पर्यायी यंत्रणा; कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Beer companies face dry day due to water shortage
पाणीटंचाईमुळे बिअर कंपन्यांवर ‘ड्राय डे’चे सावट
Anti Gundam Squad beaten Goon
पिंपरीत नागरिकांना त्रास देणाऱ्या गुंडाला गुंडा विरोधी पथकाचा चोप; ठोकल्या बेड्या

हेही वाचा… महिला हवालदाराला जखमी करण्याचा प्रयत्न; ठाकुर्लीत घडला प्रकार

मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून या तक्रारींची गंभीर दखल घेतली. शिवमंदिर स्मशानभूमी ठेकेदार सुनीता पाटील यांना नोटीस बजावली होती. यावेळी पाटील यांनी तक्रारीच्या अनुषंगाने सर्व आरोप फेटाळून लावले होते. स्मशानभूमी कर्मचारी योग्यरितीने काम पाहतात की नाही हे पाहण्यासाठी उपायुक्त गुळवे यांनी मंगळवारी सकाळी दहा वाजता मालमत्ता विभागाचे कर्मचारी पाठविले. त्यावेळी तेथील कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसले. स्मशानभूमीत कार्यरत सहा कर्मचाऱ्यांना तातडीने पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले.

विद्युत दाहिनीसाठी स्वतंत्र ठेकेदार नियुक्त असुनही तो तेथे काम करत नसल्याचे तपासणी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्या ठिकाणी लाकडे पुरवठा ठेकेदाराचे कामगार काम करीत असल्याचे आणि ते आपला व्यवसाय अधिक प्रमाणात व्हावा म्हणून विद्युत दाहिनी ऐवजी नागरिकांना पार्थिव लाकडांच्या माध्यमातून दहन करण्यास सांगत असल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा… उड्डाणपूलाच्या कामामुळे घोडबंदर मार्गावरील सेवा रस्त्यावर ‘नो पार्किंग’

ठेकेदाराला नोटीस देऊनही स्मशानभूमीतील गैरप्रकार सुरू असल्याने उपायुक्त गुळवे यांनी ठेकेदाराला २४ तासात आपला ठेका का रद्द करण्यात येऊ नये म्हणून नोटीस बजावली आहे. खुलासा न केल्यास एकतर्फी ठेका रद्द करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांबरोबर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या डोंबिवली शाखेने या प्रकरणी कारवाई व्हावी म्हणून आयुक्त डाॅ. जाखड यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

“ शिवमंदिर स्मशानभूमीतील ठेकेदाराला योग्यरितीने काम करण्याची समज देऊनही त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. त्यामुळे ठेकेदाराला ठेका रद्द करण्याची नोटीस बजावली आहे.” – वंदना गुळवे, उपायुक्त, मालमत्ता विभाग.