scorecardresearch

Premium

ठाणे: कुख्यात गुंड रवि पुजारीचा हस्तक अटकेत; मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल

रवि पुजारीच्या टोळीतील गुंडांनी २०१७ मध्ये रोमा बिल्डर्स या कंपनीच्या महेंद्र पमनानी यांच्याकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.

arrest
प्रातिनिधिक छायाचित्र

कुख्यात गुंड रवि पुजारी याचा हस्तक विजय साळवी उर्फ विजय तांबट याला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. २०१७ मध्ये एका बांधकाम व्यवसायिकाकडून १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी विजय साळवी विरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनिमय (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा >>> आमदार अपात्रतेच्या ३४ याचिकांच्या एकत्रित सुनावणीवर नार्वेकरांचा महत्त्वाचा निर्णय

mill workers got houses
पात्र ५८५ गिरणी कामगार अखेर हक्काच्या घरात, कोन पवनेलमधील घरांचे वितरण
Singapore DBS Bank Cuts Billions in CEO Pay
विश्लेषण : …म्हणून सिंगापूरच्या डीबीएस बँकेने सीईओंच्या वेतनात केली कोट्यवधींची कपात; कारण जाणून घ्या
Atrocity case
आमदार गणपत गायकवाड यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, व्दारलीतील महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
Enforcement Directorate likely to file a case in the extortion case of 164 crores
१६४ कोटींच्या खंडणीप्रकरणी ईडीही गुन्हा दाखल करण्याची शक्यता

कुख्यात गुंड रवि पुजारीच्या टोळीतील गुंडांनी २०१७ मध्ये रोमा बिल्डर्स या कंपनीच्या महेंद्र पमनानी यांच्याकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. काही दिवसांनी रवि पुजारीच्या दोन हस्तकांनी बांधकाम व्यवसायिकाच्या कार्यालयात शिरून गोळीबार केला होता. त्यानंतर ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने दोघांना अटक केली होती. तर विजय साळवी हा आरोपी फरार झाला होता. त्यामुळे ठाणे पोलिसांनी ‘लुक आऊट नोटीस’ काढली होती. विजय हा संयुक्त अरब अमिरातमधून गुरुवारी विमानाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला असता, तेथील प्राधिकरणाने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Notorious gangster ravi pujari aide arrested in mumbai airport zws

First published on: 20-10-2023 at 20:54 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×