ठाणे : आपत्कालीन परिस्थितींमध्ये सज्जतेची चाचणी घेण्यासाठी केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध शहरांमध्ये ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिल राबविण्यात येत आहे. आज, या मॉक ड्रिल चे ठाण्यातील लोढा आमरा, कोलशेत मैदान येथे दुपारी 4 वाजता आयोजन करण्यात आले आहे.

या मॉक ड्रिलचे आयोजन जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, प्रांताधिकारी उर्मिला पाटील आणि नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार उमेश पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात येत आहे. ही मॉक ड्रिल केवळ आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी असून वास्तविक आपत्ती उद्भवलेली नाही, हे नागरिकांनी लक्षात ठेवावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. अशा प्रकारे असेल मॉक ड्रिल

सायरन वाजवण्यात येईल.

एअर स्ट्राइक/ बॉम्ब हल्ल्याची सूचना दिली जाईल.

नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी सूचना दिल्या जातील.

गोंधळ न करता नियोजित पद्धतीने नागरिकांची सुरक्षित हालचाल करण्यात येईल.

संबंधित परिसरात शोधमोहीम राबवली जाईल.

जखमी व अडकलेल्या नागरिकांची तातडीने सुटका करून त्यांना प्रथमोपचार दिला जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी घाबरू नये

या मॉक ड्रिलमध्ये सहभागी असलेल्या सर्व यंत्रणांनी ही प्रक्रिया गांभीर्याने पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दुपारी ४ वाजता सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, सेल्फी काढू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी उर्मिला पाटील आणि तहसिलदार उमेश पाटील यांनी केले आहे.